Advertisement

पत्री पुलाच्या गर्डर लॉचिंगसाठी आणखी मेगाब्लाॅकची गरज?

मेगाब्लॉकचा कालावधी संपल्याने कल्याणमधील पत्री पुलाच्या गर्डर लॉचिंगंचं काम थांबवण्यात आलं असून रेल्वेने उर्वरीत कामासाठी आणखी एका तासांचा मेगाब्लॉक द्यावा, अशी मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली आहे.

पत्री पुलाच्या गर्डर लॉचिंगसाठी आणखी मेगाब्लाॅकची गरज?
SHARES

मेगाब्लॉकचा कालावधी संपल्याने कल्याणमधील पत्री पुलाच्या गर्डर लॉचिंगंचं काम थांबवण्यात आलं असून रेल्वेने उर्वरीत कामासाठी आणखी एका तासांचा मेगाब्लॉक द्यावा, अशी मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली आहे.

कल्याण-डोंबिवलीकरांसाठी वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा कल्याणमधील जुना पत्रीपूल धोकादायक झाल्याने तो दोन वर्षपूर्वी पाडण्यात आला. या पुलाच्या जागी नवीन पूल बांधण्यात अनेक तांत्रिक अडथळे येत होते. अखेर हे अडथळे दूर करून पुलासाठी गर्डर टाकण्याच्या कामाला मुहूर्त मिळाला.

पत्रीपुलाच्या गर्डर लॉचिंगच्या कामासाठी मध्य रेल्वेने शनिवार आणि रविवारमधील (२१-२२ नोव्हेंबर २०२०) प्रत्येकी ४ तास अशा एकूण ८ तासांचा मेगाब्लॉक दिला होता. त्यानुसार शनिवारी गर्डर लाॅचिंगच्या कामाला सुरूवात झाली. या कामाची राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, एमएसआरडीसीचे राधेश्याम मोपलवार आदींनी पाहणी केली.

त्यानंतर रविवारी मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकात उद्यान एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने मेगाब्लॉक उशिरा सुरू झाला. कल्याण रेल्वे स्थानकामधून ९ वाजून ५० मिनिटाला पंचवटी एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने रवाना केल्यावर मेगाब्लॉक सुरू करण्यात आला. तर सकाळी साडेदहा वाजता दुसऱ्या दिवसाच्या गर्डर लॉचिंगच्या कामाला सुरूवात झाली. हे काम नियोजीत वेळेपेक्षा अर्धा तास उशीराने सुरू झाल्याने दिलेल्या कालावधीत ४७ मीटर गर्डर लॉचिंगचं काम होण्याऐवजी केवळ ३० मीटरचंच काम पूर्ण झालं.  

त्यानंतर मेगाब्लाॅकचा कालावधी संपल्याने काम थांबवण्यात आलं. सद्यस्थितीत १८ मीटर लाॅचिंगचं काम शिल्लक असल्याने आणखी एक मेगाब्लाॅक मिळताच काम पूर्ण होईल. यासाठी रेल्वेसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती श्रीकांत शिंदे यांनी दिली.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा