Advertisement

'पीडब्लूडी'चा विक्रम, एका दिवसात बांधला ४० किमी रास्ता

महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या या कामगिरीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सनेही नोंद घेतली आहे.

'पीडब्लूडी'चा विक्रम, एका दिवसात बांधला ४० किमी रास्ता
SHARES

एका दिवसात ४० किलोमीटर लांबीचा रास्ता बांधण्याचा विक्रम सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्लूडी - pwd) केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने (Maharashtra Public Works Department) सातारा जिल्ह्यात राज्य मार्ग क्र. १४७ वर सलग २४ तास काम करून तब्बल ३९.६९ किलोमीटर लांबीच्या एक लेन रस्त्याचे बिटुमिनस काँक्रिटीकरणाचं काम केलं आहे. महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या या कामगिरीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सनेही ( Limca Book of Records) नोंद घेतली आहे.

सलग २४ तास काम करून एका बाजूचा रस्ता पूर्ण करण्याचा विक्रम करून पीडब्लूडीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी  महाराष्ट्राचा, देशाचा मान वाढविला आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सातारा विभागामार्फत सध्या सातारा जिल्ह्यामध्ये राज्य मार्ग क्र. १४७ फलटण ते म्हासुर्णे या रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. रविवार,  ३० मे २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपासून ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत सलग २४ तास काम करून तब्बल ३९.६९ किलोमीटर लांबीच्या एका लेनचे बिटुमिनस काँक्रिट रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. २४ तासांत सुमारे ४० किलोमीटरचा एका बाजुचा रस्ता पूर्ण करण्याचा हा एक विक्रम आहे. 

विभागाच्या या कामगिरीबद्दल मंत्री चव्हाण म्हणाले की, कोरोनाच्या या काळामध्ये अनेक अडचणी असताना बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि या प्रकल्पाचे काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीचे अभियंते, कर्मचारी व कामगारांनी केलेली ही कामगिरी नक्कीच आनंददायी, प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे. त्यासाठी मी संपूर्ण यंत्रणेचे मनापासून अभिनंदन करतो. आपण सर्वांनी महाराष्ट्राचा, देशाचा मान वाढवला आहे.

आज एक नवीन विक्रम झाला म्हणून आम्ही इथेच थांबणार नाही. विक्रम रचणे ही एक अभिमानास्पद बाब आहे. मात्र आपलाच विक्रम मोडून नवीन विक्रम प्रस्थापित करणे, ही अधिक अभिमानास्पद बाब असते. त्यामुळे पुढील काळात आधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक उपकरणे वापरून आणखी नवे उच्चांक नोंदवण्याची, तसेच दर्जेदार व उत्तमोत्तम काम करण्याचे आमचे धोरण आहे व त्या दृष्टीने कामे करण्याचे निर्देश मी विभागाला दिलेले आहेत, असेही चव्हाण यांनी यावेळी सांगितलं.



हेही वाचा -

राज्यात १५ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढला; पाहा काय बंद काय सुरू?

  1. मुंबईतील रस्त्यांवर होणाऱ्या गर्दीवर मुख्यमंत्र्यांची नाराजी, निर्बंध कडक करण्याचा इशारा
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा