Advertisement

रेलटेलने ४ हजार रेल्वे स्थानकांवर सुरू केली प्रीपेड वायफाय सेवा

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (रेलटेल) ने भारतीय रेल्वे मार्गावरील ४ हजार रेल्वे स्थानकांवर हायस्पीड इंटरनेट वायफायची प्रीपेड सेवा गुरूवारपासून सुरु केली आहे.

रेलटेलने ४ हजार रेल्वे स्थानकांवर सुरू केली प्रीपेड वायफाय सेवा
SHARES

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (रेलटेल) ने भारतीय रेल्वे मार्गावरील ४ हजार रेल्वे स्थानकांवर हायस्पीड इंटरनेट वायफायची प्रीपेड सेवा गुरूवारपासून सुरु केली आहे. त्यामुळे आता प्रवाशांना ३० मिनिटानंतर पैसे भरून वायफाय प्लान खरेदी करून रेल्वे स्थानकावर इंटरनेट सुविधा मिळणार आहे.यासाठी प्रवासी नेट बँकिंग, ई - वॉलेट आणि क्रेडिट कार्डचा वापर करु शकतात.

सध्या देशभरात ५९५० हजारांहून अधिक स्थानकांवर रेल वायर नावाने मोफत वायफाय सुविधा उपलब्ध आहे. मात्र, आता रेल्वे प्रवाशांना स्थानकावर ३० मिनिटांनंतर सुद्धा वायफाय सुविधा घेता येणार आहे. फक्त त्यासाठी प्रवाशांना सहशुल्क प्लान खरेदी करावा लागणार आहे.

रेलटेलचे सीएमडी पुनीत चावला यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशमधील २० रेल्वे स्टेशनवर प्रीपेड वायफायची चाचणी केली आहे. यामध्ये मिळालेल्या प्रतिसादानुसार आम्ही या योजनेची सुरुवात भारतातील चार हजारपेक्षा जास्त रेल्वे स्टेशनवर करत आहोत. आमची ही योजना सर्व रेल्वे स्थानकांना वायफायला जोडण्यासाठी आहे.

रेल्वे स्थानकावर वायफाय सुविधा वापरणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला 1 एमबीपीएसच्या गतीने प्रतिदिन ३० मिनिटांपर्यत निशुल्क वाय-फायची सुविधा मिळते. आता ३४ एमबीपीएसपर्यत हायस्पीड वायफाय सुविधा मिळण्याकरिता रेल्वे प्रवाशांना नाममात्र शुल्क द्यावं लागणार आहे. सध्या ही योजना ४ हजार रेल्वे स्थानकावर सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतरही रेल्वे स्थानकात ही योजना सुरू करण्यात येईल, असं रेलटेलने सांगितलं आहे. 

असे आहेत प्लॅन्स

१० रुपयांत ५ जीबी डेटा, व्हॅलिडीटी एक दिवस

१०  रुपयांत १० जीबी डेटा, व्हॅलिडीटी एक दिवस

२० रुपयांत १० जीबी डेटा, व्हॅलिडीटी पाच दिवस

३० रुपयांत २० जीबी डेटा, व्हॅलिडीटी पाच दिवस

४० रुपयांत २० जीबी डेटा, व्हॅलिडीटी दहा दिवस

५० रुपयांत ३० जीबी डेटा, व्हॅलिडीटी दहा दिवस

७० रुपयांत ६० जीबी डेटा, व्हॅलिडीटी तीस दिवस

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा