Advertisement

मुंबईत प्रथमच लाल आणि पांढरी झेब्रा क्रॉसिंग


मुंबईत प्रथमच लाल आणि पांढरी झेब्रा क्रॉसिंग
SHARES

मुंबईत प्रथमच दोन झेब्रा क्रॉसिंगचा रंग बदलून लाल आणि पांढरा करण्यात आला आहे.  MMRDA ने या आठवड्यात त्यांच्या कार्यालयाजवळील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मधील रस्त्यांवर या रंगांची ओळख करून दिली आहे.

चांगल्या दृश्यमानतेसाठी लखनौ आणि नाशिकसह इतर काही शहरांमध्ये क्रॉसिंगचे हे रंग मोठ्या प्रमाणावर वापरले गेले आहेत.

इंडियन रोड काँग्रेस (IRC) कलर कोड मार्गदर्शक तत्त्वांनुसार हे रंग वापरण्यात आले आहेत. रस्ता डांबरी आणि सिमेंटचा बनवताना रंगाच्या खुणा यात फरक असतो. डांबरी रस्त्यांवर पांढरे आणि काळे रंग दिसत असले तरी सिमेंटच्या रस्त्यांवर तेच रंग नीट दिसत नाहीत. IRC नुसार, ज्या भागांत जास्त गर्दी असते, कोणत्याही ठिकाणी वाहनांच्या पार्किंगमुळे रहदारी होऊ शकते किंवा कॉर्पोरेट भागात वाहनांची जास्त हालचाल होत असेल, तर अशावेळी कलर कोड 35 - लाल रंगाचा वापर करण्यास परवानगी आहे.

बीकेसी हे कॉर्पोरेट क्षेत्र आहे. सरकारी कार्यालयांव्यतिरिक्त, तिथे अनेक बँका आणि खाजगी कंपन्यांची मुख्य कार्यालयं आहेत. त्यामुळे शहरातही काही वर्दळीचे रस्ते आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बीकेसी रस्त्यावरील लाल आणि पांढर्‍या रंगाचे आयुष्य २ वर्षांपर्यंत असते. परंतु भारतीय रस्त्यांची परिस्थिती पाहता ते एक वर्ष असू शकते. मात्र या नवीन रंगांच्या वापरामुळे किती फरक पडतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा