Advertisement

वरळी बीडीडीच्या निविदेचे ग्रहण सुटले, एसडी काॅर्पोरेशनला उच्च न्यायालयाचा दिलासा


वरळी बीडीडीच्या निविदेचे ग्रहण सुटले, एसडी काॅर्पोरेशनला उच्च न्यायालयाचा दिलासा
SHARES

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील बीडीडी चाळीच्या बांधकामासाठीच्या निविदा प्रक्रियेला गेल्या काही महिन्यांपासून वादाचे ग्रहण लागले होते. अखेर हे ग्रहण सुटले आहे. निविदा प्रक्रियेत तांत्रिक अडचणींमुळे सहभागी होता न आल्याचा दावा करत उच्च न्यायालयात धाव घेतलेल्या एस.डी. काॅर्पोरेशन (शापुरजी-पालनजी-दिलीप ठक्कर) ला अखेर उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. एसडी काॅर्पोरेशनची निविदा वरळीच्या निविदा प्रक्रियेत सहभागी करून देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

वरळी, ना. म. जोशी आणि नायगाव या बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. ना. म. जोशी आणि नायगावच्या पुनर्विकासाला याआधीच सुरूवात झाली आहे. तर वरळीच्या पुनर्विकासासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. तीन कंपन्यांकडून निविदा सादर झाल्या आहेत.


एसडी काॅर्पोरेशन निविदा सादर करू शकली नव्हती

तीन कंपन्यांच्या बरोबरीने एसडी काॅर्पोरेशननेही निविदा सादर केली होती. मात्र अंतिम क्षणी तांत्रिक अडचण आली आणि त्यांची निविदा सादर होऊ शकली नव्हती. त्यामुळे एसडी काॅर्पोरेशनने उच्च न्यायालयात धाव घेत निविदा सादर करून घेण्याची मागणी केली नि निविदा प्रक्रिया रोखून धरली.


अखेर दिलासा

या याचिकेवरील सुनावणीदरम्यान गेल्या आठवड्यात न्यायालयाने एसडी काॅर्पोरेशनला दिलासा दिला आहे. हा सार्वजनिक प्रकल्प असून यात जितक्या अधिकाधिक निविदा सादर होतील तितके स्पर्धेच्या दृष्टीने चांगलेच असल्याचे म्हणत न्यायालायने एनआयसी (नॅशलन इन्फाॅर्मेटीक्स सेंटर)ला एसडी काॅर्पोरेशनची निविदा सादर करून घेण्याचे आदेश दिले असल्याची माहिती मुंबई मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. त्यानुसार लवकरच ही निविदा सादर करुन घेतली जाणार असल्याने आता वरळीच्या स्पर्धेत तीन एवजी चार कंपन्या असणार आहे. त्यामुळे आता वरळीच्या निविदेत कोण बाजी मारते याकडेच साऱ्यांचे लक्ष लागले आहे.


पहिल्यांदाच असे घडतेय

कुठल्याही प्रकल्पासाठी वा कामासाठी निविदा वा ई-निविदा काढताना निश्चित वेळेत निविदा सादर करणाऱ्या कंपन्यांनाच निविदा प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाते. मग तांत्रिक कारण असो वा इतर कुठल्याही कारणांनी उशीरा निविदा सादर करणाऱ्या कंपन्यांना पुन्हा संधी दिली जात नाही वा तशी देताही येत नाही. पण आता पहिल्यांदाच वरळी निविदेच्या बाबतीत वेगळे घडताना दिसत आहे. निविदा मागवून झाल्यानंतर आता एसडी काॅर्पोरेशनची निविदा सादर होणार आहे.हेही वाचा -

वरळी बीडीडीसाठी तीन बड्या कंपन्या उत्सुकडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा