Advertisement

कोस्टल रोड बांधकामामुळे पाच महिन्यांसाठी वाहतुकीत बदल

मुंबई वाहतूक पोलिसांकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

कोस्टल रोड बांधकामामुळे पाच महिन्यांसाठी वाहतुकीत बदल
(File Image)
SHARES

मरीन ड्राइव्हच्या दक्षिणेकडील कॅरेजवेवर म्हणजेच तारापोरवाला मत्स्यालय ते इस्लाम जिमखाना दरम्यान एस.डब्लू.डी. ड्रेनेज आउटफॉलचे काम करणे आवश्यक आहे.

या कामाला पाच महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने दक्षिण मुंबईत वाहतुकीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. याबाबत मुंबई वाहतूक पोलिसांकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एस.डब्लू.डी. ड्रेनेज आउटफॉलचं काम याच आठवड्यात सुरू होणार असून या कामासाठी पाच महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत वाहतुकीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

त्यानुसार एनएस मार्गावरून दक्षिणेकडे जाणारी वाहतूक जिमखान्याजवळील सर्व्हिस रोडवर वळवण्यात आली आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईत वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, नागरिकांनी प्रवासाठी एनएस मार्गाचा वापर करणे टाळावे, अशी सूचना वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली आहे.

तसेच दक्षिण मुंबईतून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी महर्षी कर्वे रोड, केम्प्स कॉर्नर, नाना चौक, ऑपेरा हाऊस, सैफी हॉस्पिटल, चर्चगेट स्टेशन या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.



हेही वाचा

मुंबई ट्रान्स हार्बर समुद्री मार्ग वर्षाअखेरीस सेवेत दाखल होण्याची शक्यता

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा