Advertisement

अंधेरी आरटीओ झोपडपट्टी पुनर्विकासाच्या निवडणुकीत शिव इन्फ्रास्ट्रक्चरची बाजी!

झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणा(एसआरए)च्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या निवडणुकीत ५ बिल्डरांमधून शिव इन्फ्रास्ट्रक्चर समुहानं बहुमत मिळवत बाजी मारल्याची माहिती 'एसआरए'तील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.

अंधेरी आरटीओ झोपडपट्टी पुनर्विकासाच्या निवडणुकीत शिव इन्फ्रास्ट्रक्चरची बाजी!
SHARES

अंधेरी आरटीओ, अण्णानगर अर्थात 'सुजलाम सुफलाम एसआरए गृहनिर्माण सोसायटी'च्या बिल्डर निवडीसाठी बुधवारी निवडणूक झाली. झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणा(एसआरए)च्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या निवडणुकीत ५ बिल्डरांमधून शिव इन्फ्रास्ट्रक्चर समुहानं बहुमत मिळवत बाजी मारल्याची माहिती 'एसआरए'तील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली. शिव इन्फ्रास्ट्रक्चरला २१३ मत मिळाली आहेत. या निवडीनंतर कित्येक वर्षे रखडलेल्या अंधेरी आरटीओ झोपडपट्टीचा पुनर्विकास शिव इन्फ्रास्ट्रक्चरकडे जाणार हे निश्चित झालं आहे.


पुनर्विकास १४ वर्षांपासून रखडला

अंधेरी आरटीओ झोपडपट्टीचा पुनर्विकास गेल्या १४ वर्षांपासून रखडला आहे. मे. के. एस. चमणकर एंटरप्रायझेसला २००४ मध्ये अण्णानगर-कासमनगर आणि विठ्ठल-रखुमाईनगर या २ झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासासाठी परवानगी देण्यात आली होती. या पुनर्विकासाच्या प्रस्तावानुसार बिल्डरनं झोपडपट्टीवासीयांचं पुनर्वसन करत त्या मोबदल्यात महाराष्ट्र सदन, आरटीओ काॅम्प्लेक्स आणि हायमाऊंट गेस्ट हाऊस अशी १०० कोटींची काम करून देणं बंधनकारक होतं. ही काम केल्यानंतरच बिल्डरला ३३ हजार चौ. मीटर जागेवर निर्माण होणारा टीडीआर देण्यात येणार होता. त्यानुसार २००६ मध्ये या अटींवर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.


घोटाळा आला उघडकीस

चमणकर बिल्डरने महाराष्ट्र सदन आणि हेस्ट हाऊस बांधलं. थोड्या थोडक्या झोपडपट्टीवासीयांचं पुनर्वसन केलं. त्यानंतर उर्वरित पुनर्विकास रखडला तो रखडलाच. त्यातच महाराष्ट्र सदन घोटाळा उघड झाला नि प्रकल्प पुढे सरकण्याची आशा मावळली. सरतेशेवटी गेल्या वर्षी एसआरएने झोपु. योजनेत अकार्यक्षमता दाखवल्याचा ठपका ठेवत चमणकर बिल्डरकडून हा प्रकल्प काढून घेतला. त्यानंतर हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी एसआरने निवडणूक प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारी, ३ आॅक्टोबरला अंधेरी आरटीओ इथे निवडणूक झाली.


कुणाला, किती मते?

६ बिल्डरांनी या झोपु. योजनेत उत्सुकता दर्शवली होती. मात्र निवडणुकीला काही दिवस शिल्लक असतानाच एल अॅण्ड टी या बड्या कंपनीनं यातून माघार घेतली. त्यामुळं ५ बिल्डरांमध्ये ही निवडणूक झाली नि त्यात शिव इन्फ्रास्ट्रक्चरनं बाजी मारली. त्यांना २१३ मत मिळाली, तर मोफत घराबरोबर ५ लाखांचा विमा, मुलांच्या शिक्षणाचा-मुलीच्या लग्नाचा खर्च उचलू अशी अनोखी आॅफर देत झोपडपट्टीवासीयांना आकर्षित करू पाहिलेल्या गुजरातच्या मानव बिल्डरला १०३ मत मिळाली. उर्वरित ३ बिल्डरांना अनुक्रमे १, २ आणि ४ अशी मतं मिळाली.

एकूणच या निवडणुकीत शिव इन्फ्रास्ट्रक्चरने बाजी मारली असून बहुमत मिळाल्यानं हा प्रकल्प त्यांच्याकडे जाणार आहे. मात्र याची अधिकृत घोषणा 'एसआरए'चे मुख्य कार्यकारी अधिकारीच घेतली, असं 'एसआरए' अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.हेही वाचा-

२०० कोटींची बँक गॅरंटी २० कोटींवर! 'एसआरए' अजूनही बिल्डरच्या प्रतिक्षेत

घरासोबत लग्न-शिक्षणाचा खर्च, नाश्ता-जेवणही; एसआरए प्रकल्पासाठी बिल्डरची अाॅफर
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा