आरे प्रश्नी तोडगा निघणार?

 Mumbai
आरे प्रश्नी तोडगा निघणार?

मुंबई- मेट्रो-3 चे कारशेड आरेमध्ये नको असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसरा पर्याय शोधा असे आदेश नुकतेच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला दिले आहेत. वनशक्ती आणि सेव्ह आरेच्या सदस्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि आरेत कारशेड बांधल्यास पर्यावरणाची हानी कशी होईल याची माहिती देत कारशेड आरेतून हलवण्याची मागणी केली. या मागणीनुसार मुख्यमंत्र्यांनी एमएमसीला कारशेडची जागा बदलण्याचे आदेश दिले आहेत. तर यासाठी सेव्ह आरे बरोबर बैठक घेण्याचेही आदेश दिले आहेत.

या आदेशानुसार एमएमआरसीने सेव्ह आरेबरोबर चर्चा करण्यासाठी एक बैठक बोलावली आहे. ही बैठक येत्या शुक्रवारी होण्याची शक्यता आहे अशी माहिती सेव्ह आरेतील एका सदस्यने दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी आता या प्रश्नी लक्ष घातल्याने आणि चर्चेलाही सुरुवात झाल्याने या प्रश्नी तोडगा निघेल का? याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पण एमएमआरसी नेमकी काय भूमिका घेते यावर सर्व अवलंबून आहे. कारण मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही एमएमआरसी आरेशिवाय पर्याय नाही हा रेटा काही सोडताना दिसत नाही.

Loading Comments