ताडदेव देशातलं सर्वात महाग ठिकाण

दक्षिण मुंबईतील ताडदेव परिसर देशातील सर्वात महागडा निवासी परिसर असल्याचं एका सर्वेक्षणातून पुढं आलं आहे. एनराॅक या प्राॅपर्टी सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीने नुकतंच एक सर्वेक्षण केलं होतं.

SHARE

दक्षिण मुंबईतील ताडदेव परिसर देशातील सर्वात महागडा निवासी परिसर असल्याचं एका सर्वेक्षणातून पुढं आलं आहे. एनराॅक या प्राॅपर्टी सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीने नुकतंच एक सर्वेक्षण केलं होतं. या सर्वेक्षणानुसार देशातील १० सर्वात महागड्या परिसराची यादी तयार करण्यात आली.  

‘ही’ १० शहरं महागडी

या यादीत ताडदेव पहिल्या क्रमांकावर असून मुंबईतील वरळी आणि महालक्ष्मी हे निवासी परिसर अनुक्रमे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यापाठोपाठ नुंगमबक्कम (चेन्नई), एगमोर (चेन्नई), करोलबाग (दिल्ली), अन्ना नगर (चेन्नई), कोरेगाव पार्क (पुणे), गोल्फ कोर्स (गुरूग्राम, हरियाणा), अलीपोरे (कोलकाता) या ठिकाणांचा समावेश होतो.

‘इतकी’ किंमत

ताडदेव परिसरातील एका चौरस फूट जागेची किंमत ५६ हजार रुपये इतकी आहे. ताडदेव पाठोपाठ येणाऱ्या वरळीतील एका चौ.फूट जागेची किंमत ४१,५०० रुपये इतकी असून महालक्ष्मी येथील प्रति फूट जागेची किंमत ४० हजार रुपये इतकी आहे. 

चौथ्या क्रमांकावर चेन्नई

या यादीत चेन्नईतील नुंगमबक्कम हा परिसर १८ हजार रुपये प्रति चौरस फुटासह चौथ्या, एगमोर १५,१०० रुपये प्रति चौरस फुटासह पाचव्या, तर अन्ना नगर १३ हजार रुपये प्रति चौरस फुटासह सातव्या स्थानावर आहे. तर दिल्लीचा करोलबाग १३,५०० रुपये प्रति चौरस फूट दरासह सहाव्या क्रमांकावर आहे.

तर हरियाणाच्या गुरुग्राममधील गोल्फ कोर्स हा परिसर १२,५०० रुपये चौरस फूट किंमतीसह या यादीत नवव्या क्रमांकावर आहे. तसंच कोलकातामधील अलीपोरे दहाव्या चौ.फूट ११,८०० रुपये किंमतीसह दहाव्या स्थानावर आहे.हेही वाचा-

१० हजारांहून जास्त रक्कम काढताय? एटीएम मागणार ओटीपी

आर सीटी मॉलमध्ये ओपन होणार IKEAचं शॉपसंबंधित विषय
ताज्या बातम्या