Advertisement

'झोपु'चा पुन्हा दणका! 30 बिल्डरांचे प्रकल्प रद्द


'झोपु'चा पुन्हा दणका! 30 बिल्डरांचे प्रकल्प रद्द
SHARES

झोपडपट्टी पुनर्विकास योजना रखडवणाऱ्या बिल्डरांना दणका देण्यास गेल्या काही महिन्यांपासून झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने सुरुवात केली आहे. त्यानुसार आतापर्यंत 30 बिल्डरांच्या 'झोपु' योजना रद्द करण्यात आल्याची माहिती झोपु प्राधिकरणातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.


दोषी बिल्डरांवर होणार कारवाई

ही योजना रखडवणाऱ्या अजूनही 150 हून अधिक बिल्डरांना नोटीस पाठवण्यात आल्या असून त्यांची सुनावणी सुरू आहे. या सुनावणीत जे बिल्डर दोषी ठरतील त्यांच्या योजना रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे आता या बिल्डरांच्या बाबतीत 'झोपु' प्राधिकरण काय आदेश देते? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.



हे देखील वाचा -

भांडखोर सोसायट्यांना 'झोपु' प्राधिकरणाचा दणका



काही खासगी बिल्डरांनी झोपुकडून योजनेसाठी परवानगी घेतली, पण जवळपास 20 वर्षांपासून योजना काही मार्गी लावली नाही, असे बिल्डर 'झोपु' प्राधिकरणाच्या रडारवर आहेत. अशा योजना रखडवणाऱ्या सुमारे 208 बिल्डरांना प्राधिकरणाने शोधून काढले आहे. या सर्व बिल्डरांना नोटीसा पाठवत स्पष्टीकरण देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बिल्डरांच्या स्पष्टीकरणानुसार त्यांची सुनावणी घेत सुनावणी अखेरीस 'झोपु' राबवण्यास अकार्यक्षम ठरलेल्या बिल्डरांच्या झोपु योजना रद्द करण्याचा सपाटा प्राधिकरणाने लावला आहे. त्यानुसार आतापर्यंत 30 बिल्डरांच्या झोपु योजना रद्द केल्याची माहिती प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.


या बिल्डरांच्या 'झोपु' योजना रद्द

  • महाराष्ट्र सदन प्रकल्पातील विकासक मे. के. एस. चमणकर
  • धनश्री बिल्डर
  • मे. फ्रिस्कॉन इन्फ्रा
  • यश बिल्डर्स
  • मे. एस. के. कॉर्पोरेशन
  • मे. स्कायलार्क बिल्डकॉन
  • मे. लकी डेव्हलपर्स



आणखी नावे जाणून घेण्यासाठी हे वाचा -

झोपु रखडवणाऱ्या 24 बिल्डरांना झोपुचा दणका


रद्द करण्यात आलेल्या 'झोपु' योजना आता नव्याने मार्गी लावण्यात येणार आहेत. त्यासाठी सोसायट्यांना नव्या बिल्डरची निवड करावी लागणार आहे.


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा