Advertisement

मुंबईतील 35 हजार घरांना पंधरा दिवसांत मिळणार ओसी


मुंबईतील 35 हजार घरांना पंधरा दिवसांत मिळणार ओसी
SHARES

वांद्रे - झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणा(SRA)ने आतापर्यंत झोपु योजनेंतर्गत लाखो झोपड्यांचा पुनर्विकास केला. मात्र, पुनर्विकासातील 35 हजार सदनिकांना अद्याप ओसी (भोगवटा प्रमाणपत्र) मिळाली नसल्याची माहिती समोर आली आहे. आता 7 मार्चपासून एसआरएतर्फे विशेष पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले असून सर्वांना ओसीवाटप होणार आहे.

ओसी नसल्याने अशा सदनिकाधारकांना दाम दुपटीने पाणीबिल, घरभाडे आणि इतर कर आकारणी करावी लागत आहे. विकासक आणि सोसायटीमधील वाद तसेच अन्य कारणांमुळे ओसी मिळण्यास विलंब होत असल्याचेही समोर आले आहे. रहिवाशी झोपु प्राधिकरणाकडे खेटे मारून हैराण झाले असताना झोपु प्राधिकरण मात्र आजवर शांत होते.

अखेर या प्रश्नी झोपु प्राधिकरणाला जाग अाली असून आता प्राधिकरणाने ओसी पंधरवडा मोहीम राबवित सदनिकांना ओसी देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती झोपुचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांनी ‘मुंबई लाइव्ह’ला दिली आहे.

7 मार्चपासून या विशेष पंधरवडयाला सुरुवात होत आहे. यासाठी झोपु ने स्वतंत्र कक्ष सूरु केला आहे. या कक्षाशी संपर्क साधत ओसी न मिळालेल्या सदनिकांनी ओसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असे आवाहन झोपु कडून करण्यात आले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा