म्हाडा उपाध्यक्षांना एसआरएची नोटीस

  Pali Hill
  म्हाडा उपाध्यक्षांना एसआरएची नोटीस
  मुंबई  -  

  मुंबई - झोपडपट्टी पुनर्विकासासाठी आवश्यक त्या परवनाग्या झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण(एसआरए)कडून घेऊनही वर्षानुवर्षे काम सुरू न करणाऱ्या 114 बिल्डरांना एसआरएनं नोटीसा बजावल्यात. या 114 बिल्डरांमध्ये म्हाडाचाही समावेश आहे. वांद्रे रेक्लमेशन येथील झोपू प्रकल्पासाठी म्हाडाने परवनगी घेऊनही काम सुरू न केल्यानं म्हाडा उपाध्यक्ष संभाजी झेंडे यांच्या नावे नोटीस पाठवली आहे. एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांनी ‘मुंबई लाइव्ह’शी बोलताना याला दुजोरा दिला.

  झोपू प्रकल्प रखडवत हक्काच्या घरापासून झोपडपट्टीवासियांना दूर ठेवणाऱ्या बिल्डरांना दणका देण्यासाठी एसआरएनं नोटीसा बजावण्यास सुरूवात केली. या नोटीसांना समाधानकारक उत्तर न देणाऱ्या बिल्डरांविरोधात कडक कारवाईही करण्यात येणार आहे. असं असताना यात म्हाडासारख्या सरकारी यंत्रणेचाही समावेश असल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. याविषयी म्हाडा उपाध्यक्ष संभाजी झेंडे यांना विचारले असता त्यांनी अद्याप अशी नोटीस आपल्या हातात पडली नसल्याचं सांगितलं. तर नोटीस मिळाली तर योग्य ते उत्तर देऊ असंही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान ज्या प्रकल्पासाठी नोटीस पाठवण्यात आली, त्या प्रकल्पात अनेक तांत्रिक अडचणी असल्यानं प्रकल्प रखडल्याचं म्हाडाचं म्हणणं आहे. त्यामुळे आता म्हाडाच्या उत्तरानंतर एसआरए काय निर्णय घेतं हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.