Advertisement

मुंबईत लवकरच पहिला 'पीएमएवाय' प्रकल्प, झोपु प्राधिकरण बांधणार ४७,९८४ घरं

सन २०००-२०११ पर्यंतच्या झोपडीधारकांना 'पीएमएवाय'अंतर्गत घरं देण्याचा निर्णय झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरा (एसआरए)ने घेतला आहे. त्यानुसार ४७ हजार ९८४ घरं या योजनेखाली झोपडीधारकांसाठी बांधण्यात येणार आहेत. यासाठी ३१८ प्रकल्पांना 'एलओआय' मिळाल्याने लवकरच हे प्रकल्प मार्गी लागणार असल्याची माहिती 'एसआरए'तील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.

मुंबईत लवकरच पहिला 'पीएमएवाय' प्रकल्प, झोपु प्राधिकरण बांधणार ४७,९८४ घरं
SHARES

'पंतप्रधान आवास योजने'द्वारे ठाणे, कोकण आणि नवी मुंबईसह राज्यभर घरांची उभारणी होत आहे. त्याचवेळी मुंबईत 'पीएमएवाय'अंतर्गत अद्याप एकही घर बांधण्यात आलेलं नाही. पण लवकरच मुंबईतील गोरगरीबांना खूशखबर मिळणार आहे. कारण मुंबईतही पहिला 'पीएमएवाय'प्रकल्प आकारास येणार आहे. फरक इतकाच की ही घरं सिडको वा म्हाडाच्या कोकण मंडळाप्रमाणे लाॅटरीद्वारे 'पीएमएवाय' नोंदणीधारकांना उपलब्ध होणार नाहीत. तर ही घरं २००० ते २०११ पर्यंतच्या झोपडीधारकांना बांधकाम शुल्कात उपलब्ध होणार आहेत.


'एसआरए'चा निर्णय

सन २०००-२०११ पर्यंतच्या झोपडीधारकांना 'पीएमएवाय'अंतर्गत घरं देण्याचा निर्णय झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरा (एसआरए)ने घेतला आहे. त्यानुसार ४७ हजार ९८४ घरं या योजनेखाली झोपडीधारकांसाठी बांधण्यात येणार आहेत. यासाठी ३१८ प्रकल्पांना 'एलओआय' मिळाल्याने लवकरच हे प्रकल्प मार्गी लागणार असल्याची माहिती 'एसआरए'तील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.


२२ लाख घराचं लक्ष्य

'सर्वांसाठी घरं', असं म्हणत केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजना आणली असून याद्वारे अत्यल्प गटातील 'पीएमएवाय' नोंदणीधारकांना परवडणाऱ्या दरांत घरं देण्यात येणार आहेत. या योजनेखाली राज्यभरात २२ लाख घराचं लक्ष्य राज्य सरकारने समोर ठरवलं आहे. हे लक्ष्य म्हाडा, सिडको, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प आणि झोपु प्राधिकरणा (एसआरए)च्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार आहे.


मुंबईत जागेची अडचण

सिडको आणि म्हाडाच्या कोकण मंडळासह इतर विभागीय मंडळाकडे मोकळी जागा असल्याने ही मंडळं घरांच्या कामाला लागली आहेत. मात्र मुंबईत जागाच नसल्याने मुंबई मंडळ, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प आणि एसआरएची मोठी अडचण होत असल्यानं मुंबईत 'पीएमएवाय'चं एकही घर अद्याप आकार घेऊ शकलेलं नाही.


४७ हजार घरं

अशात एसआरएनं २०००-२०११ पर्यंतच्या झोपड्यांना बांधकाम शुल्कात घर देण्याचा निर्णय घेत ही घर 'पीएमएवाय'अंतर्गत बांधण्याचं ठरवलं आहे. त्याप्रमाणं आतापर्यंत ३१८ प्रकल्पांसाठी 'एसआरए'ला 'एलओआय'ही मिळाला आहे. तर या योजनेखाली झोपडीधारकांसाठी ४७ हजार ९८४ घरं बांधत ते बांधकाम शुल्क आकारून त्यांना वितरीत करण्यात येणार आहेत.


मिळणार अनुदान

बांधकाम शुल्कातील अडीच लाखाची रक्कम अनुदान म्हणून लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. या योजनेखाली ४७ हजार ९८४ पुनर्वसीत घरांव्यतिरीक्त २८ हजार ९८४ अतिरिक्त घरं उपलब्ध होणार आहेत. ही घरं 'पीएपी' म्हणून अर्थात प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी वापरण्यात येणार असल्याचंही 'एसआरए'तील अधिकाऱ्याने सांगितलं आहे. ४७ हजार ९८४ घरांपैकी २२ हजार ७७७ घरांच्या बांधकामाला लवकरच सुरूवात होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.



हेही वाचा-

'पीएमएवाय'मध्ये नोंदणी करायचीय? मग सकाळी ९ ते १ अशी वेळ काढा

Exclusive: झोपडपट्टीवासीयांची चांदी! 'एसआरए'त मिळणार ३०४ चौ. फुटाचं घर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा