Advertisement

गिरणी कामगारांच्या घरांच्या किंमती दुप्पट, संघटना आक्रमक

गिरणी कामगारांच्या (Mill worker) घरांच्या किंमती (House price) अचानक दुप्पट झाल्याने गिरणी कामगार कृती संघटना संतप्त झाली आहे.

गिरणी कामगारांच्या घरांच्या किंमती दुप्पट, संघटना आक्रमक
SHARES

गिरणी कामगारांच्या (Mill worker) घरांच्या किंमती (House price) अचानक दुप्पट झाल्याने गिरणी कामगार कृती संघटना संतप्त झाली आहे. घरांच्या किंमती साडेनऊ लाख रुपयांवरून तब्बल १८ लाख रुपयांवर गेल्या आहेत. गिरणी कामगारांच्या घरांविषयी मंत्रालयात गुरूवारी बैठक झाली. यावेळी घरांच्या किमती दुप्पट झाल्याचं ऐकताच कामगार संघटनांचे प्रतिनिधी अवाक् झाले.  गिरणी कामगारांची बाजू न ऐकता परस्पर किमती वाढवल्याने  गिरणी कामगार संघटना आक्रमक झाल्या आहेत. किंमतवाढ मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा गिरणी कामगार कृती संघटनेने दिला आहे. 

 गिरणी कामगारांच्या (Mill worker) प्रलंबित प्रश्नावर चर्चा करण्यासाठी राज्याचे सचिव अजय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मंत्रालयात बैठक झाली.  वरिष्ठ अधिकाऱ्यांसह गिरणी कामगार संघटनेचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. यावेळी म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी-उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी बॉम्बे डाइंग, स्प्रिंग मिल, बॉम्बे डाइंग टेक्सटाइल, श्रीनिवास गिरण्यांच्या घरांची सोडत रविवार १ मार्चला काढण्यात येणार असल्याचं सांगितलं. ही सोडत म्हाडाच्या वांद्रे येथील मुख्यालयात सकाळी १० वाजता निघणार आहे. यासंदर्भात चर्चा होत असतानाच गिरणी कामगारांच्या घरांच्या किमती १८ लाख रुपये झाल्याचंही सांगण्यात आलं.  

म्हाडा (mhada) गिरणी कामगारांची  (Mill worker) घरं (house) बांधणार आहे.  या घरांच्या किंमती साडेनऊ लाख रुपये असल्याचं राज्य सरकारने आधीच जाहीर केलं आहे. घरांच्या किंमती अचानक दुप्पट झाल्याने  कृती संघटना चक्रावल्या आहे. किमती वाढवण्याचा निर्णय कधी झाला याची काहीच कल्पना संघटनांना नव्हती. त्यामुळे संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. म्हाडाने घरांच्या किमती वाढवणे अन्यायकारक असून, नवीन किंमत मान्य होणारी नाही. त्यामुळे पूर्वीप्रमाणे साडेनऊ लाख रुपयेच किमत ठेवावी, अन्यथा तीव्र आंदोलन पुकारलं जाईल, असा इशारा गिरणी कामगार कृती संघटनेचे प्रवीण घाग यांनी दिला आहे. 



हेही वाचा -

८ दिवसांत १२५ कोटींचा मालमत्ता कर वसूल

मेट्रो-३ मार्गातील मिठी नदीखालील भुयारीकरण पूर्ण




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा