Advertisement

घर घेणं आता महागणार, राज्य सरकारने घेतला 'हा' निर्णय

राज्यातील बांधकाम व्यवसायाला बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी मागील वर्षी राज्य सरकारने डिसेंबर २०२० पर्यंत ६ टक्के असलेल्या मुद्रांक शुल्कात ३ टक्के सवलत दिली होती.

घर घेणं आता महागणार, राज्य सरकारने घेतला 'हा' निर्णय
SHARES

घर, जमीन खरेदी करणं आता महागणार आहे. मुद्रांक शुल्कात दिली जाणारी २ टक्के सवलत रद्द करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता घर, जमीन खरेदीवर ५ टक्के मुद्रांक शुल्क द्यावं लागणार आहे.

मुद्रांक शुल्कात ३ महिने मुदतवाढ दिली जाईल असं बोललं जात होतं. पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी विरोध केल्यानंतर ही सवलत मागे घेण्यात आली आहे. मुद्रांक शुल्कात सवलत देण्याबाबत मुदतवाढ द्यावी असा प्रस्ताव महसूल विभागाने दिला होता. पण वित्त विभाग आणि मुख्यमंत्री यांनी त्यास मंजुरी दिली नाही. 

राज्यातील बांधकाम व्यवसायाला बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी मागील वर्षी राज्य सरकारने  डिसेंबर २०२० पर्यंत ६ टक्के असलेल्या मुद्रांक शुल्कात ३ टक्के सवलत दिली होती. त्यानंतर मार्चपर्यंत २ टक्के सवलत देण्यात आली होती. पण आता ही सवलत रद्द केली गेली आहे. घर, जमीन खरेदीवर आता पूर्ण ५ टक्के मुद्रांक शुल्क भरावं लागणार आहे.

हेही वाचा -

  1. एफआयआर कुठंय? परमबीर सिंह यांना हायकोर्टाने फटकारलं

  1. कोरोना रुग्णासाठी बेड पाहिजे?, 'या' नंबरवर त्वरीत संपर्क साधा
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा