• भगतसिंहनगरमध्ये शैाचालयाची दुरवस्था
SHARE

गोरेगाव - भगतसिंहनगर 1 मध्ये शौचालयासाठी खड्डा खणून ठेवला खरा, मात्र शौचालय बांधण्याचं काम पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे  रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. महिला आणि पुरुषांनाही एकाच शौचालयात जावे लागते. गेल्या साडेचार वर्षापासुन शौचालयाचं पाणी रत्यावर येत होतं. त्यामुळे पादचारी आणि वाहनांनाही त्यातून रस्ता काढून जावं लागत होतं. स्थानिकांच्या वारंवार तक्रारीमुळे पालिकेनं शौचालय तोडून नवीन बांधण्याचं काम सुरू केलं. मात्र अजूनही ते काम पूर्ण होऊ शकलेलं नाही. या खड्ड्यातून ड्रेनेज लाइनही गेल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलीय. त्याबरोबरच खड्डा खुला असल्यानं त्यात कुणीही पडण्याची शक्यता असल्याचं काँग्रेसचे जिल्हा सचिव गौरव राणे यांनी सांगितलं. याबाबत नगरसेविका प्रमिला शिंदे यांनी सांगितलं की, एका झोपडीचा अडथळा होत असल्यामुळे काम थांबलं आहे. मात्र पालिका काम करणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या