महिला शौचालयाची दुरवस्था

 Khardeo Nagar
महिला शौचालयाची दुरवस्था
महिला शौचालयाची दुरवस्था
See all

खारदेवनगर - चेंबूरच्या खारदेवनगर येथील संजय स्मृती सत्यनारायण सोसायटी जवळील महिलांच्या सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झालीय. त्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ झालीय. काही दिवसांपूर्वी एक महिला पडून जखमी झाली होती. मात्र अद्याप पालिकेकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्यानं महिला वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत येथील राष्ट्रवादीचे वॉर्ड अध्यक्ष दीपक सावंत यांनी अनेकदा पालिकेकडे तक्रार केली. मात्र पालिका दुर्लक्ष करत असल्यानं परिसरातील महिलांना सोबत घेऊन एम पश्चिम कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला.

Loading Comments