Advertisement

पर्यावरण संवर्धनासाठी 'ट्री लव्हर्स ऑफ सांताक्रुझ'


पर्यावरण संवर्धनासाठी 'ट्री लव्हर्स ऑफ सांताक्रुझ'
SHARES

मुंबई - विकासाच्या नावावर मुंबईत मोठ्या संख्येने झाडांची कत्तल होत आहे. झाडांच्या कत्तलीचा परिणाम तापमान बदलासह वायुप्रदुषण आणि इतर प्रदुषणातून जाणवू लागला आहे. त्यामुळेच आता सामान्य मुंबईकरांनाही झाडांचे महत्त्व समजू लागले आहे. त्यातूनच एकीकडे सेव्ह ट्री, सेव्ह आरे, वनशक्तीच्या माध्यमातून झाडांची कत्तल रोखण्यासाठी लढा सुरू आहे. तर दुसरीकडे आता सर्वसामान्य मुंबईकरही झाडे वाचवण्यासाठी पुढे येत आहेत. सांताक्रुझमधील रहिवाशांनी अशाच प्रकारे पुढाकार घेत मोठ्या संख्येने आसपास झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे.

सांताक्रुझ, खार दांडा परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल झाली आहे. तर यापुढेही झाडे तोडली जाणार आहेत. झाडे तोडली जात असल्याने रस्ते भकास झाले असून, येथील प्रदुषणातही वाढ झाली आहे. त्यामुळे येथील रहिवाशांनी एकत्र येत 'ट्री लव्हर्स ऑफ सांताक्रुझ' ग्रुपची स्थापना केली आहे. या ग्रुपकडून खार दांडा परिसरातील झाडांची कत्तल रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे झाडांचे पुनर्रोपन करण्यासह मोठ्या संख्येने झाडे लावण्याचा निर्णय या ग्रुपने घेतल्याची माहिती ग्रुपच्या सदस्या प्रेरणा सोधी यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.

खारदांडा परिसरातील मोकळ्या जागेचा शोध या ग्रुपने घेतला असून, येथे झाडे लावण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी पालिकेकडे प्रस्तावही पाठवण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत असून, या प्रस्तावाला लवकरात लवकर मंजुरी मिळावी यासाठी आता या ग्रुपने ऑनलाईन सह्यांची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेलाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही सोधी यांनी सांगितले आहे. सांताक्रुझ, खारदांडामधील रहिवासी जसे जागरूक झाले तसे सर्व मुंबईकर जागरूक झाले तर प्रदुषणावर मात करणे सहज सोपे होईल हे नक्की.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा