Advertisement

मुंबई ते कन्याकुमारी महामार्ग; अर्थसंकल्पात पायभूत सुविधांसाठी मोठी तरतूद

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी रोजी २०२१-२२ आर्थिक वर्षचा अर्थसंकल्प सादर केला.

मुंबई ते कन्याकुमारी महामार्ग; अर्थसंकल्पात पायभूत सुविधांसाठी मोठी तरतूद
SHARES

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी रोजी २०२१-२२ आर्थिक वर्षचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. पायाभूत सुविधांसाठी ही अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आली आहे. यातील मुंबई-कन्याकुमारी महामार्गासाठी ६४ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटी तर नागपूर मेट्रोसाठी ५९७६ कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबई ते कन्याकुमारी या महामार्गासाठी तरतूद करण्यात आली आहे. १७६० किलोमीटर लांबीचा मुंबई-कन्याकुमारी महामार्ग भारत माला प्रकल्पात विकसित केला जात आहे. भारत माला प्रकल्पांतर्गत मुंबई-कन्याकुमारी आर्थिक कॉरिडोरचा भाग म्हणून देशभरात ५० हजार कोटी रुपयांचे महामार्ग विकसित केले जात आहेत.

मुंबई ते कन्याकुमारीपर्यंत बांधल्या गेलेल्या या कॉरिडॉरमुळं पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेश सुधारला जाईल आणि या क्षेत्राची आर्थिक उन्नती होणार आहे. केरळमधील मुंबई ते कन्याकुमारी कॉरिडोरच्या ६०० किलोमीटर विभागासह ६५०० कोटींच्या गुंतवणूकीसह केरळ राज्यात ११०० किलोमीटर राज्य महामार्गाचे बांधकाम केले जाणार आहे.

नितीन गडकरी यांनी ऑक्टोबरमध्ये केरळमधील ११,५७१ कोटींच्या ७ महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी केली. शिवाय, काझकोट्टम ते मुकोला दरम्यान २७ किलोमीटर लांबीचा महामार्ग प्रकल्पही सुरू केला. जागतिक दर्जाच्या परिवहन सुविधांना प्राधान्य दिलं जात आहे. यासाठी देशात भारतमाला प्रकल्प सारख्या योजना राबविल्या जात आहेत.

भारत माला सागरमाला योजनेंतर्गत, देशातील बंदर रस्ता कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी रोडमॅप तयार करण्यात आला आहे. भारत माला प्रकल्प हा आतापर्यंतचा देशातील सर्वात मोठा प्रकल्प मानला जात आहे. रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाच्या मते, भारत-प्रकल्पांतर्गत दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे, दिल्ली-अमृतसर कटरा एक्स्प्रेस वे, चेन्नई-बेंगळुरू एक्सप्रेस वे असे मोठे कॉरिडोर विकसित केले जाणार आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा