...आणि लाखो लिटर पाणी रस्त्यावर आले!


SHARE

चेंबूर - तीन तलाव परिसरात सोमवारी पाण्याची पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली आहे. विशेष म्हणजे स्थानिक रहिवासी मनोज वर्मा यांनी पालिकेच्या पाणी विभागाकडे तक्रार देऊनही दुपारपर्यंत कुणीच फिरकले नसल्याने लाखो लीटर पाणी वाया गेले. एकीकडे पाण्यासाठी महाराष्ट्रातील काही भागांत नागरिक वणवण फिरताना दिसत आहेत तर दुसरीकडे मुंबईसारख्या परिसरात अशा प्रकारे पाण्याच्या पाईप लाईन फुटून लाखो लीटर पाणी वाया जातानाचे चित्र आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या