मागील वर्षी ३ जुलै रोजी पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकातील गोखले पुलाची पादचारी मार्गिका पडल्याची दुर्घटना घडली होती. त्यानंतर पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या पुलांची पाहणी करण्यासाठी आयआयटीसह रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकानं पुलांचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, २९ उड्डाण पूल आणि ११५ पादचारी पुलांचं सेफ्टी ऑडिट केले असून, त्यापैकी २३ उड्डाणपुलांचा तर ४८ पादचारी पुलांचा सुरक्षा अहवाल प्राप्त झाला आहे. नव्या पुलांच्या बांधकामावेळी पश्चिम रेल्वे गंज लागू नये यासाठी स्टेनलेस स्टील, उच्च प्रतीचं काँक्रीट आणि मजबूत तसंच हलक्या वजनाच्या कार्बनचा वापर करणार आहे. पश्चिम रेल्वे प्रथमच कार्बनचा वापर करणार आहे.
मुंबईतील धारावी, अंधेरी आणि मालाड येथील उड्डाणपुलांच्या मजबुतीकरणाच्या कामासाठी कार्बनचे तुकडे वापरण्यात येणार आहेत. हे कार्बनचे मटेरियल स्टीलच्या तुलनेत पाचपट मजबूत असून त्याचं वजन कमी आणि मजबुती जास्त असल्यानं त्यांचा वापर करण्यात येणार आहे. मात्र, कार्बनच्या वापरानंतर पादचारी पूल किती वर्ष टिकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
पश्चिम रेल्वेनं वर्षभरानंतर अंधेरीतील गोखले पुलाच्या गर्डरची दुरुस्ती केली. त्यानंतर, दोन्ही पादचारी मार्गिकांची दुरुस्ती पूर्ण केली. तसंच हा मार्ग प्रवाशांच्या वापरासाठी खुला करण्यात आला.
हेही वाचा -
मालाड दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदारला महापालिकेची कारणे दाखवा नोटीस
बेस्ट उपक्रमाच्या बसच्या भाडेकपातीला आरटीएची मंजुरी