Advertisement

पाच मोनोरेलचे आश्वासन हवेतच


पाच मोनोरेलचे आश्वासन हवेतच
SHARES

मुंबई - मुंबईतील, देशातील पहिल्यावहिल्या मोनोरेल प्रकल्पातील वडाळा ते जेकब सर्कल हा दुसरा टप्पा या वर्षी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल, असं स्वप्न एमएमआरडीएनं दाखवलं खरं, पण अजूनही पाच मोनोगाड्यांचा काही पत्ताच नाही. वडाळा ते जेकब सर्कल आणि चेंबूर ते जेकब सर्कल अशा मार्गावर मोनो सेवा पुरवण्यासाठी एकूण पंधरा मोनो गाड्यांची गरज आहे. त्यातील दहा मोनोगाड्या सध्या सेवेत दाखल असून चेंबूर ते वडाळा मार्गावर धावत आहेत. तर पाच मोनो गाड्या 2015 मध्ये मुंबईत दाखल होणार होत्या, पण जानेवारी 2017 उजाडलं,  तरी या गाड्या काही दाखल झालेल्या नाहीत. त्यामुळे दुसरा टप्पा सुरू करण्यास विलंब होणार का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
मोनोगाड्या मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांची चाचणी घेण्यात येईल आणि त्यानंतरच या गाड्या सेवेत दाखल केल्या जातील. मात्र अजून गााड्याच आल्या नसल्याने चाचणी कधी होणार आणि गाड्या सेवेत कधी दाखल होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान याविषयी एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त संजय खंदारे आणि संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा