Advertisement

आगरी कबड्डी स्पर्धेत दुर्गामाता, भवानीमाता उपांत्य फेरीत


आगरी कबड्डी स्पर्धेत दुर्गामाता, भवानीमाता उपांत्य फेरीत
SHARES

प्रथमेश पालांडे आणि आशिष पालयेच्या तुफानी चढायांच्या जोरावर दुर्गामाता स्पोर्टस क्लबने जय ब्राह्मणदेवचा ३५-२५ असा पराभव करून बोकड आणि कोंबड्यासाठी खेळल्या जात असलेल्या आगरी कबड्डी महोत्सव स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. भवानीमाता संघाने साई के दिवाने संघाचा ३०-१४ असा पराभव केला तर एकता संघाने साईराजचे कडवे आव्हान मोडीत काढले. ओम साईनाथ सेवा ट्रस्टनेही सहज विजयासह उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले.


प्रथमेश पालांडेच्या दमदार चढाया

प्रभादेवीच्या राजाभाऊ साळवी मैदानात उभारलेल्या किरण पाटील क्रीडानगरीत स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी कबड्डीप्रेमींना फारसा थरारक खेळ पाहण्याची संधी मिळाली नाही. प्रथमेश पालांडेने दमदार चढायांमुळे दुर्गामाताने नवव्या मिनीटालाच ब्राह्मणदेववर लोण चढवून आघाडी घेतली आणि मध्यंतराला ती आघाडी १७-९अशी वाढवली. मध्यंतरानंतर ब्राह्मणदेवच्या अमोल आणि देवराज या गावंड बंधूंनी प्रतिकार केला. पण फारसा उपयोग झाला नाही.



भवानीमाता की जय हो

भवानी माता आणि साई के दिवाने या संघात झालेल्या सामन्यात १०-८ अशी स्थिती असताना कल्पेश पवार आणि सिद्धेश परबने खोलवर चढाया करीत पाठोपाठ दोन लोण चढवत सामन्यावर आपली पकड मजबूत केली. भवानीमाताने हा सामना ३०-१४ अशा मोठ्या फरकाने जिंकला.


एकताची बाजी

एकता संघाने साईराज स्पोर्टसचा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. दोन्ही संघात एकापेक्षा एक चढाईपटू असल्यामुळे शेवटची दहा मिनीटे शिल्लक असताना २५-२३ असे चित्र होते. अखेरीस शुभम आणि रत्नाकर या पाटलांनी जोरदार खेळ करीत आघाडी घेतली आणि ती शेवटपर्यंत ३५-२७ अशी टिकवली. ओम साईनाथने विद्यासागर मंडळाचा २९-१६ असा धुव्वा उडवला.


हेही वाचा -

प्रभादेवीत बोकडासाठी घुमणार कबड्डीचा दम!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा