चुरशीच्या सामन्यात इंडियन आर्मी संघ विजयी

  Trombay
  चुरशीच्या सामन्यात इंडियन आर्मी संघ विजयी
  मुंबई  -  

  अखिल भारतीय इंटर इन्स्टिट्युशनल कबड्डी स्पर्धेत इंडियन आर्मी संघाने बी. इ. जी - पुणे संघाचा 5 गुणांनी पराभव करत जेतेपद पटकावले. चुरशीच्या झालेल्या या अंतिम सामन्यात प्रो कबड्डीपटू मोनू गोयल, संजीवा सोन यांनी दमदार खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

  डी. ए. इ. आणि बी. ए. आर. सी. स्पोर्ट्स क्लबतर्फे अखिल भारतीय कबड्डी फेडरेशन मान्यतेच्या कबड्डी स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू मोनू गोयल हा ठरला. उत्कृष्ट चढाईचा पुरस्कार एम. एस. इ. बी. संघाच्या नितीन देशमुखने तर उत्कृष्ट पकडीचा पुरस्कार बी. इ. जी. - पुणे संघाच्या विवेक घुलेने पटकावला.

  अंतिम फेरीत इंडियन आर्मी कबड्डी संघाचे चढाईपटू मोनू गोयल, संजीवा, सोनू विरुद्ध बी. इ. जी - पुणे संघाचे चढाई बहाद्दर प्रो कबड्डीपटू मोहित मल्लिक, नरेंद्र कुमार यांच्यामधील रंगतदार खेळ प्रेक्षकांना पहायला मिळाला. इंडियन आर्मीने पहिल्या डावात घेतलेली 19-14 अशी आघाडी अखेरीस 32-27 अशा विजयाने अजिंक्यपदास गवसणी घालणारी ठरली. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंडियन आर्मी संघाने मुंबईच्या जे. जे. हॉस्पिटल संघावर 18-7 असा तर बी. इ. जी. - पुणे संघाने एम. एस. इ. बी. संघावर 45-17 असा सहज विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.