Advertisement

राष्ट्रीय कबड्डी खेळाडू दाजी बिरमोळे काळाच्या पडद्याआड!


राष्ट्रीय कबड्डी खेळाडू दाजी बिरमोळे काळाच्या पडद्याआड!
SHARES

राष्ट्रीय कबड्डी खेळाडू बाबाजी (दाजी) बिरमोळे (79 वर्षे) घुमट-मालवण (सिंधुदुर्ग) येथे निधन झाले असून घुमट या त्यांच्या मूळगावी बुधवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुन आणि नातवंडे असा परिवार आहे.

कबड्डी वर्तुळात ते दाजी बिरमोळे या नावानेच प्रसिद्ध होते. लोअर परळ-मुंबई येथील श्रीराम संघाकडून ते बाबाजी जामसांडेकर, दत्ता मालप यांच्या बरोबरीने खेळले होते. मुंबई, कटक, अमृतसर येथे झालेल्या तीन राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. 

छोट्या चणीचे असलेले दाजी बैठी लाथ मारून गुण वसूल करण्यात माहीर होते. ते किरकोळ शरीरयष्टीचे असल्यामुळे ताकदीपेक्षा युक्तीने गुण मिळवत. कल्पकता आणि संयम त्यांच्या खेळात असल्यामुळे विरुद्ध संघाचा अभ्यास करून ते गडी टिपत. गेले काही दिवस ते अर्धांगवायूच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्या निधनाने "चढाईच्या जादुगाराला" कबड्डी परिवार मुकले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा