Advertisement

अाशियाई कबड्डी स्पर्धेसाठी रिशांक देवाडिगाची भारतीय संघात निवड


अाशियाई कबड्डी स्पर्धेसाठी रिशांक देवाडिगाची भारतीय संघात निवड
SHARES

प्रो-कबड्डीमधील महाराष्ट्राचे स्टार खेळाडू तसेच काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राला राष्ट्रीय विजेतेपद मिळवून देणारे कबड्डीपटू रिशांक देवाडिगा अाणि गिरीश इरनाक यांची अाशियाई क्रीडा स्पर्धेकरिता भारताच्या कबड्डी संघात निवड करण्यात अाली अाहे. ४० क्रीडा प्रकारांचा समावेश असलेली १८वी अाशियाई क्रीडा स्पर्धा जकार्ता, इंडोनेशिया येथे १८ अाॅगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत खेळवली जाणार अाहे.


सोनाली शिंगटे, सायली केरीपाळेचीही निवड

मुंबईत राहणारी अाणि रेल्वेचे प्रतिनिधीत्व करणारी सोनाली शिंगटे त्याचबरोबर पुण्याची सायली केरीपाळे यांचीही भारताच्या महिला कबड्डी संघात निवड करण्यात अाली अाहे. राष्ट्रकुलनंतर महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या चार खेळाडूंची निवड झाल्यामुळे महाराष्ट्राच्या कबड्डी वर्तुळात अानंद साजरा केला जात अाहे. लवकरच या चौघांना कबड्डी दिनानिमित्त गौरवण्यात येणार अाहे.

दुबईनंतर अाता जकार्ता

दुबई येथील मास्टर कबड्डी स्पर्धेत रिशांक अाणि गिरीश या दोघांचीही निवड झाली होती. मात्र या दोघांना पाकिस्तानविरुद्धच्या सुरुवातीच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र त्यानंतर मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करत या दोघांनी अापले नाणे खणखणीत असल्याचे दाखवत अाशियाई क्रीडा स्पर्धेतही भारतीय संघात स्थान पक्के केले. दुबई स्पर्धेसाठी भारतीय संघात असलेल्या सुरजित, सुरिंदर नाडा अाणि मनजित चिल्लर यांना वगळण्यात अालं अाहे.


हेही वाचा -

अाशियाई क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे 'हे' कबड्डीपटू निवडीच्या शर्यतीत

महाराष्ट्रानं पटकावलं ११ वर्षानंतर राष्ट्रीय कबड्डीचं जेतेपदसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा