Advertisement

मुंबईच्या गोल्फादेवीनं सिंधुदुर्गातली राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धी जिंकली


मुंबईच्या गोल्फादेवीनं सिंधुदुर्गातली राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धी जिंकली
SHARES

मुंबईतील दोन संघांनी सिंधुदुर्ग, देवगड येथील जामसंडे सन्मित्र मंडळानं अायोजित केलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत अापली छाप पाडली. अंतिम सामन्यात मुंबईच्याच दोन संघांमध्ये विजेतेपदासाठी चुरस रंगली होती. अखेर मुंबई शहरच्या गोल्फादेवी संघाने मुंबई उपनगरच्या स्वस्तिक क्रीडा मंडळाचा प्रतिकार ३७-२१ असा मोडीत काढत विजेतेपदाला गवसणी घातली.


गोल्फादेवीची सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड

अाक्रमक सुरुवात करत गोल्फादेवीने सुरुवातीपासूनच सामन्यावर अापली पकड मिळवली होती. शार्दूल हरचकर, धनंडय सरोज, सिद्धेश पिंगळे यांनी दमदार खेळाचे प्रदर्शन करत गोल्फादेवीला अाघाडीवर अाणून ठेवले. त्यामुळे मध्यंतराला २२-१४ अशी अाघाडी घेतली होती. उत्तरार्धातही खेळात सातत्य ठेवत गोल्फादेवीने स्वस्तिकची डाळ शिजू दिली नाही. शार्दूल, धनंजय, सिद्धेश यांनी गोल्फादेवीच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. स्वस्तिककडून सिद्धेश पांचाळ अाणि अलंकार पाटील यांनी थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण अापल्या संघाला विजय मिळवून देण्यात ते अपयशी ठरले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा