Advertisement

स्वामी मुक्तानंद हायस्कूलची राज्यस्तरीय कबड्डीसाठी निवड, मुंबईचं करणार प्रतिनिधित्व

बारामती येथे राज्यस्तरीय कबड्डी सामान्याचं आयोजन करण्यात येणार असून यात मुंबई पुणे, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, औरंगाबाद, लातूर व नागपूर अशा आठ विभागाचे संघ सहभागी होणार आहेत.

स्वामी मुक्तानंद हायस्कूलची राज्यस्तरीय कबड्डीसाठी निवड, मुंबईचं करणार प्रतिनिधित्व
SHARES

चौदा वर्षीय मुलींच्या कबड्डी सामन्यात चेंबूरच्या स्वामी मुक्तानंद हायस्कूलची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. १९ ऑक्टोबर रोजी झालेल्या विभागस्तरीय कबड्डी स्पर्धेत अंतीम फेरीत विजेतपद पटकावत त्यांनी राज्यस्तरीय पातळीवर धडक झाली आहे. विशेष म्हणजे चौदा वर्षीय मुलींच्या कबड्डी सामन्यात स्वामी मुक्तानंद हायस्कूल मुंबई विभागाचं प्रतिनिधित्व करणार आहे. 


बारामतीला राज्यस्तरीय स्पर्धा

१९ ऑक्टोबर रोजी १४ वर्षाखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेचं मालाड उत्कर्ष विद्यामंदिरच्या मैदानात आयोजन केलं होतं. या स्पर्धेत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे शहर व ग्रामीण, पालघर, रायगड, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, मीरा भाईंदर, वसई विरार, नवी मुंबई, पनवेल अादी संघ सामील झाले होते. या सामन्यातील अंतिम फेरीत ठाणे जिल्ह्याच्या संघाचा पराभव करत स्वामी मुक्तानंद शाळेनं विजय मिळवला.

राज्यस्तरीय सामन्यासाठी मुंबई विभागातून पात्र ठरणारा हा एकमेव संघ आहे. लवकरच बारामती येथे राज्यस्तरीय कबड्डी सामान्याचं आयोजन करण्यात येणार असून यात मुंबई पुणे, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, औरंगाबाद, लातूर व नागपूर अशा आठ विभागाचे संघ सहभागी होणार आहेत.


आंतरराष्ट्रीय कबड्डी सामन्यांमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारी अभिलाषा म्हात्रे, राष्ट्रीय स्तरावर खेळणारे रिबेका पॉल-गवारे व राजश्री पवार या सर्व स्वामी मुक्तानंद हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनी आहेत. त्यानुसार राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झालेल्या या संघाचं मला विशेष कौतुक आहे. - विवेक थोरात,  मुख्याध्यापक, स्वामी मुक्तानंद हायस्कूल चेंबूर हेही वाचा - 

प्रो कबड्डी पर्व ६ : यू मुम्बा संघातील 'या' चढाईपटूनं रचला इतिहास

स्वामी मुक्तानंद हायस्कूलची विभागस्तरीय कबड्डी सामन्यासाठी निवड
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा