Advertisement

प्रो कबड्डी पर्व ६ : यू मुम्बा संघातील 'या' चढाईपटूनं रचला इतिहास


प्रो कबड्डी पर्व ६ : यू मुम्बा संघातील 'या' चढाईपटूनं रचला इतिहास
SHARES

प्रो-कबड्डीच्या सहाव्या पर्वात यू मुंम्बा संघातील सर्वोत्तम चढाईपटू सिद्धार्थ देसाईनं इतिहास रचला आहे. सिद्धार्थने प्रो कबड्डीमध्ये पदार्पण करत चार सामन्यांमध्ये बळींचे अर्धशतक पूर्ण केलं आहे. याआधी अनुप कुमार आणि अजय ठाकूर या दोन खेळाडूंनी हा विक्रम केला होता. मात्र हा विक्रम त्यांनी पाच सामन्यांमध्ये केला होता. परंतु, सिद्धार्थने फक्त चार सामन्यांमध्येच बळींचे अर्धशतक पूर्ण करत ५१ गुणांची कमाई केली आहे.


'त्याची' जागा भरून काढली

यू मुम्बानं ३४ लाखांची बोली लावत राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सिद्धार्थला आपल्या संघात दाखल केलं होतं. यू मुम्बा संघाने मागील पाच पर्व कर्णधार अनूप कुमारच्या जोरावर चांगली कामगिरी केली होती. मात्र यंदाच्या पर्वात अनूप कुमार संघात नसल्याने त्याची जागा सिद्धार्थ भरून काढताना पाहायला मिळत आहे.


 सिद्धार्थ पाचव्या स्थानी

या पर्वात नवे खेळाडू अनुभवी खेळाडूंना चांगलीच टक्कर देताना पाहायला मिळत आहे. यामध्ये सर्वोत्तम चढाईपटूंच्या यादीत सिद्धार्थ देसाई पाचव्या स्थानावर आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा