• अजूनही उशीर नाही झाला, तुमचे हे '५' संकल्प देशासाठी फायदेशीर
  • अजूनही उशीर नाही झाला, तुमचे हे '५' संकल्प देशासाठी फायदेशीर
  • अजूनही उशीर नाही झाला, तुमचे हे '५' संकल्प देशासाठी फायदेशीर
  • अजूनही उशीर नाही झाला, तुमचे हे '५' संकल्प देशासाठी फायदेशीर
  • अजूनही उशीर नाही झाला, तुमचे हे '५' संकल्प देशासाठी फायदेशीर
SHARE

नव्या वर्षाला कोणाचे काही ना काही संकल्प असतातच. पण नव्याचे नऊ दिवस असं आपण म्हणतो. तसंच काहीसं आपण ठरवलेल्या संकल्पांच्या बाबतीत होतं. पण शक्य असलेले संकल्प बनवले तर अधिक सोईस्कर होईल. आता तुम्ही बोलाल संकल्प करायला खूप लेट झाला आहे. आमचे संकल्प पहिलेच फिक्स झालेत. मग काय झालं? संकल्प करायला काही वेळ काळ नसतो.

जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही संकल्प करू शकता. पण एखादा संकल्प आपल्या देशासाठी केला तर? काय हरकत आहे? नेहमीच संकल्प स्वत:साठी केले जातात. देशासोबतच हे संकल्प तुमच्यासाठीही फायदेशीर होतील. या देशाचे सामान्य नागरिक म्हणून आपण एवढं तर करूच शकतो.

) मी मतदान करेन

मतदान करणं हा आपल्या प्रत्येकाचा अधिकार आहे. मतदान न करता केवळ राजकारण आणि नेत्यांना नावं ठेवायचं काम अनेकजण करतात. पण मतदान न केल्यानं एखादा चुकीचा व्यक्ती सत्तेवर येतो.


पण अनेकजण मतदानाच्या दिवशी सुट्टी सार्वजनिक सुट्टी समजून फिरायला जातात. त्यामुळे यावर्षी मतदान करण्याचा संकल्प करा आणि दुसरे करत नसतील तर त्यांनाही त्याचं महत्त्व समजवा


) स्वच्छता ठेवीन

आपल्यापैकी अनेक जण जिथे जातात तिथे कचरा करतात. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणं, पान खाऊन थुकणं अशा प्रकारामुळे देशाचं विद्रुपीकरण करतात. यामुळे जगात भारतीय लोकांची प्रतिमा ही बेशिस्त आणि घाणेरडे अशी आहे.


आता ही परिस्थिती बदलण्याची जबाबदारी आपली आहे. यासाठी मी कचरा करणार नाही आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही, अशी भूमिका घेणं आवश्यक आहे. याशिवाय प्लास्टिकचा वापर टाळीन, वृक्ष लागवड करीन असे संकल्प केले पाहिजेत


) ट्रॅफिक नियम पाळीन

ट्रॅफिक नियमांच्या बाबतीत आपण किती जबाबदार आहोत हे काय वेगळं सांगायची गरज नाही. सिग्नल तोडणं, स्पीड लिमिट न पाळणं, गाडीचे कागदपत्र नसणं, लायसन्स न बाळगणं, १८ वर्षाखालील व्यक्तीनं गाडी चालवणं, रस्त्यावर स्टंट करणं, दारू पिऊन गाडी चालवणं

गाडी चालवत असताना फोनवर बोलणं, अशा अनेक प्रकारे आपण नियम तोडत असतो. परिणामी अनेक अपघात होत असतात. त्यामुळे यावर्षी हा नियम करा की, मी एक जबाबदार नागरिक म्हणून वाहतुकीचे सर्व नियम पाळीन


) दुसऱ्यांच्या मतांचा आदर करेन

हाताची पाच बोटं सारखी नसतात. तसंच काहीसं माणसांच्या बाबतीत म्हणता येऊ शकतं. प्रत्येक माणसाची विचार करण्याची पद्धत आणि क्षमता सारखी नसते. त्यामध्ये अनेकदा साम्य आढळतं. समोरच्या व्यक्तीचे विचार प्रत्येकालाच पटतील असं नाही.


त्यामुळे आपले विचार दुसऱ्यांवर थोपण्याचा प्रयत्न करण्यात काहीच अर्थ नाही. अमुक एका विषयावर दोन व्यक्तींचे विचार समान नसतात. त्यामुळे आपलेच विचार किंवा मत योग्य आहे यावर वाद घालण्यापेक्षा एकमेकांच्या मतांचा आदर करू हा संकल्प करणं.


) सोशल मीडियाचा गैरवापर नाही

हल्ली सोशल मीडियावर अफवांना चांगलाच पेव फुटलाय. आपल्याला आलेल्या  मेसेजमध्ये किती तथ्य आहे याची तपासणी किंवा त्यावर विचारच केला जात नाही. असे मेसेज सरळ पुढे फॉरवर्ड केले जातात. यामुळे एखादी चुकीची माहिती फॉरवर्ड केली जाते. अफवा पसरवल्यामुळे अनेकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो.

सौजन्यत्यामुळं कुठलीही पोस्ट सोशल मीडियावर लिहिताना किंवा ती कुणाला फॉरवर्ड करताना त्यातील सत्यता पडताळणं आवश्यक आहे. जरी त्यात तथ्य असलं तरी ते फॉरवर्ड केल्यावर सामाजिकदृष्ट्या काही समस्या तर उद्भवणार नाहीत याचा विचार देखील केला पाहिजे. त्यामुळे सोशल मीडियाचा गैरवापर स्वत:ही टाळावा आणि दुसऱ्यांनाही याबाबत जागृत करावं.


संबंधित विषय
ताज्या बातम्या