बोरिवलीकरांसाठी स्वस्त दरात मस्त भाजी

बोरिवली - शिंपोली परिसरातल्या मनपा मैदानात आठवडी बाजार भरवण्यात आला.  दीपलक्ष्मी महिला सेवा सहकारी संस्थेनं या आठवडी बाजाराचं आयोजन केले. संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी बाजारात ताजी भाजी विक्रीसाठी आणली. या आठवडी बाजाराला अभिनेता पुष्कर श्रोत्री यांनी हजेरी लावली. आठवडी बाजार या उपक्रमामुळे ग्राहकांना तर स्वस्त दरात मस्त भाजी मिळते. यासोबतच शेतकऱ्यांनाही दोन पैसे जास्त कमवता येतात. तर, ही भाजी खरेदी करायला ग्राहकांनीही प्रचंड गर्दी केली.

 

Loading Comments