झाकली मूठ गुगलची

  Pali Hill
  झाकली मूठ गुगलची
  मुंबई  -  

  मुंबई - गुगलतर्फे एक नवीन टूल उपलब्ध करून देण्यात आले आहे. गुगल ऍक्टिव्हिटी असं या टूलचं नाव आहे. या टूलमुळे नको असलेला सर्च डेटा कायमचा डिलिट करता येणाराय. या टूलद्वारे आपल्या अकाउंटमधून झालेले काही लाजिरवाणे किंवा गुप्त सर्च आता कुणालाही कळणार नाहीत. 

  इंटरनेटवर केलेला प्रत्येक सर्च असो किंवा युट्यूब व्हिडीओ असो प्रत्येकाची नोंद गुगल दरबारी असते. याच आवडी निवडिच्या आधारे इतर समस्त तंत्रदुनिया त्यांच्या सर्वरद्वारे प्रत्येक नेटकऱ्याची नोंद ठेवत असते. गूगलवर आपण ठेवलेल्या पाऊलखुणा ओळखून मग पाठोपाठ सुरू होतात ओनलाईन जाहिरातीचा मारा. अचानक येणाऱ्या काही लाजिरवाण्या फ्लॅशमुळे बऱ्याच नेटकऱ्यांची परिस्थिती बिकट होते. या सर्वातून मार्ग काढण्यासाठी गुगलनं हे नवीन टूल आणले आहे. 

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.