Advertisement

भारताच्या विविधतेवर चित्र प्रदर्शन


भारताच्या विविधतेवर चित्र प्रदर्शन
SHARES

वरळी - पवन आणि रीटा गुप्ता या पती-पत्नींनी काढलेल्या छायाचित्रांचं प्रदर्शन वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये भरवण्यात आलंय. रीटा आणि पवन 30 वर्षांपासून अमेरिकेत राहतायत. जेव्हा कधी ते भारतात येतात, तेव्हा अनेक ठिकाणी फिरतात. या प्रवासात भावलेल्या गोष्टी ते कॅमेऱ्यात कैद करतात. भारतातल्या विविधतेवर आधारलेलं हे त्यांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन आहे. यामध्ये 34 छायाचित्रांचा समावेश असून त्याच्या किमती 20 ते 50 हजार रुपयांपर्यंत आहेत . त्यांचं आगामी प्रदर्शन 4 फेब्रुवारी ते 4 मार्च या कालावधीत कॅलिफोर्नियात होणार आहे. मिळालेल्या पैशातली 15 टक्के रक्कम ते सामाजिक संस्थाना मदत स्वरुपात देतात. मुंबईतलं प्रदर्शन 5 डिसेंबरपर्यंत खुलं असेल.

संबंधित विषय
Advertisement