Advertisement

दिवाळीनंतर या पदार्थांच्या मदतीनं करा बॉ़डी डिटॉक्स


दिवाळीनंतर या पदार्थांच्या मदतीनं करा बॉ़डी डिटॉक्स
SHARES

सणासुदीच्या दिवसात कितीही नाही म्हटले तरी फराळ खाणं होतंच. दिवाळीत बनलेले गोडाधोडाचे पदार्थ, दिवाळी फराळ, जेवणासाठी बनलेले काही खास पदार्थांवर दिवाळीत ताव मारला जातो. हे पदार्थ आपण आवडीनं खातो. पण अतिप्रमाणात तेलकट, गोड, तिखट खाल्ल्यानं पोटाचं गणित मात्र चुकतं. जळजळणं, अपचन, गॅस असे अनेक पोटाशी संबंधीत आजार उद्भवतात. त्यामुळे दिवाळीनंतर डिटॉक्स करणं गरजेचं आहे. यामुळे शरीरातील अपायकारक घटक शरीराबाहेर फेकले जातात. आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार आहोत जे तुम्हाला डिटॉक्स करण्यात मदत करतील.

) लिंबात मुबलक प्रमाणात विटामीन सी असते. लिंबामुळे तुम्ही सर्दी आणि खोकल्यापासून स्वतःचा बचाव करू शकता. तसेच पचनशक्ती सुधारण्यासाठीदेखील लिंबू फायदेशीर आहे. लिंबाची साल देखील अँटी ऑक्सिडेट्स असते. यामुळे डिटॉक्सिफिकेशन अधिक होते.

) लिंबू आणि पाण्यासोबत मध घेतल्यानं देखील चांगला फायदा होतो. पोटाचे विकार बरे होऊन शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात

) शरीरातील तेलकट तुपकट पदार्थ बाहेर टाकण्यासाठी ग्रीन टी चा अतिशय फायदा होतो. तसंच यात डीटॉक्स एजंट असणारे कॅटेचिन आढळते जे लिव्हरच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असते.

) सणांच्या दिवसात जास्त हेवी जेवण झाले असेल तर तुम्ही टोमॅटो सूप किंवा सलाड खाऊ शकता, याने तुम्हाला हलके वाटेल. टोमॅटोमुळे पोट थंड राहण्यासही मदत होईल.

) सणाच्या काळात आपण जे पदार्थ खातो त्यामुळे फॅट्स आपल्या शरीरात प्रवेश करतात. यामुळे शरीराचा बॅलन्स थोड्याफार प्रमणात बिघडतो. अशावेळी फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्यानं आरोग्याचा पूर्णपणे समतोल राखला जातो. यासाठी पालक, सफरचंद हे पदार्थ खावेत. अथवा यांचे सूप आणि ज्यूस घ्यावे.



हेही वाचा

दिवाळीत होणाऱ्या प्रदूषणापासून 'असा' करा बचाव

हिवाळ्यात घ्या असा आहार




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा