दिवाळीत होणाऱ्या प्रदूषणापासून 'असा' करा बचाव

फटाक्यांमुळे वायू प्रदूषण होणार ते होणारच. या वायू प्रदूषणामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. खोकला, त्वचेच्या समस्या, श्वसनाची समस्या अशा अनेक आजारांमुळे तुमचे आरोग्य धोक्यात येते.

SHARE

दिवाळी म्हटलं की आकाशकंदील, फराळ, भेटवस्तू आल्याच. पण त्यासोबत आणखी गोष्ट विसरून कसं चालेल? ती म्हणजे फटाके. फटाके फोडणे हानीकारक आहे हे सर्वांनाच माहीत आहे. पण फटाके फोडण्यावर नियंत्रण ठेवणं तसं कठिणच आहे. पण आता न्यायालयाने फक्त दोनच तास फटाके फोडण्याची परवानगी दिली आहे. पण तरीही फटाक्यांमुळे वायू प्रदूषण होणार ते होणारच. या वायू प्रदूषणामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. खोकला, त्वचेच्या समस्या, श्वसनाची समस्या अशा अनेक आजारांमुळे तुमचे आरोग्य धोक्यात येते. या धोक्यापासून बचाव करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स देणार आहोत.


१) कडुलिंब हवेतील प्रदूषणाला शोषून घेतो. हवा शुद्ध करण्यासाठी आपल्या घरी कडूलिंबाच्या पानांचा एक गुच्छ ठेवा. याशिवाय लिंबाच्या पानांनी उकळलेल्या पाण्यानं तुमचा चेहरा धुवा किंवा अंघोळीच्या पाण्यात कडूलिंबाची पानं टाका. कडूलिंबाचं पाणी देखील पिता येऊ शकतं. कडूलिंबाच्या पाण्यानं रक्त शुद्ध होतं.

२) तुळस ही वनस्पती प्रत्येक घरात आढळते. आयुर्वेदामध्ये तुळशीच्या पानांचे गुणकारी गुघधर्म आणि उपाय सांगितले आहेत. तुळशीच्या पानांचा रस दोन थेंब मधासोबत घेतल्यानं श्वसनासंबंधी विकार नाहिसे होतात. तसंच तुळशीच्या पानांचा चहा घेतल्यास प्रदूषणामुळे होणाऱ्या खोकल्यास आराम मिळतो.

३) गुळाला उत्तम डिटॉक्स फुड मानले गेले आहे. प्रदूषणामुळे शरीरात गेलेल्या विषारी घटकांना बाहेर टाकण्याचे काम गुळ करते. रक्त, फुफ्फुसे, श्वसनमार्ग, खाद्यानालिका यांमध्ये अडकलेले शरीराला घातक असणारे कण गुळामुळे शरीराबाहेर पडतात. म्हणून फक्त दिवाळीतच नाही तर इतर दिवशी देखील गुळाचे सेवन केले पाहिजे.


४) प्रदूषणामुळे सर्दी झाल्यास नाकात तूप सोडावं. यामुळे नाक मोकळे होते. अनेकदा प्रदूषणामुळे हवेतील विषारी घटक पोटात जातात. अशावेळी साजूक तूप खाल्यानं पोटातील अल्सर बरा होतो. याशिवाय पोटात आग जाणवत असल्यास साजूक तुपाचा फायदा होतो.

५) हळद घातलेले दुध प्यायल्यानं त्वचेची खाज, इंफेक्शन या समस्या दूर होतात. हवेतील प्रदूषणामुळे घश्यासंदर्भात काही समस्या उद्भवल्यास हळद आणि गूळ यांच्या गोळ्या करून खाव्यात आणि कोमट पाणी प्यावं. यामुळे खोकला कमी होतो आणि घशाला आराम मिळतो.

६) केसांसाठी आणि त्वचेसाठी कोरफड अतिशय उपयोगी आहे. दिवाळीच्या वेळी कोरफडीचे विशेष महत्त्व आहे. फटाक्यांमुळे त्वचेचे काही विकार झाल्यास किंवा त्वचा भाजल्यास कोरफडीचा गर त्या जागेवर लावल्यानं आराम मिळतो.हेही वाचा

फटाके उडवताना अशी घ्या काळजी

दिवाळीत मिठाई खाताय? मग 'असा' ओळखा मिठायांवरील भेसळयुक्त चांदीचा वर्ख
संबंधित विषय