Advertisement

ड्राइव्हिंगचे हे नवे नियम प्रत्येकाला माहिती पाहिजेत


ड्राइव्हिंगचे हे नवे नियम प्रत्येकाला माहिती पाहिजेत
SHARES

तुमच्याकडे टू व्हीलर किंवा कार आहे का? मग तुम्ही हे नियम नक्कीच जाणून घेतले पाहिजेत. कारण कार आणि बाईकच्या नंबर प्लेट्स संदर्भात काही नवे नियम लागू झाले आहेत. हे नियम तुम्ही मोडले तर १० हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. त्यामुळे याच नियमाची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.


१) कार किंवा बाईकवरील नंबर प्लेट्सच्या संख्यांचा आकार कमीत कमी दोन इंच असणं आवश्यक आहे.

२) कार किंवा बाईकवर लावलेल्या नंबर प्लेटवरील क्रमांक हे वाचण्याजोगे असावेत. यासाठी फॅन्सी नंबर प्लेट लावणं हे नियमबाह्य ठरेल.

३) कार किंवा बाईकवरचे नंबर प्लेटवरील सर्व क्रमांक हे एकसारख्या आकाराचे असावेत.

४) तुमची गाडी चोरीला गेली असल्यास जुन्या गाडीचा नंबर नवीन गाडीच्या नंबर प्लेटवर लावू शकता. यासंदर्भात सुप्रीम कोर्टानं नवीन सर्क्युलर काढून हे आदेश दिले अाहेत.

५) नंबर प्लेटवर कोणत्याही प्रकारची सांकेतिक चिन्हे किंवा तत्सम गोष्टी लावणं नियमांच्या विरोधात असेल.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा