बहरली राणीची बाग...


  • बहरली राणीची बाग...
  • बहरली राणीची बाग...
  • बहरली राणीची बाग...
  • बहरली राणीची बाग...
  • बहरली राणीची बाग...
  • बहरली राणीची बाग...
SHARE

भायखळा - रंगीबिरंगी फुले, सर्वत्र फुलांचा दरवळणारा सुगंध. या सुंदर फुलांचा टवटवीतपणा मनाला मोहवून टाकतो. हिरव्यागार पानांतून डोकावणारी ही फुले स्वत:च्या वेगळेपणाची जणू साक्ष देत आहेत. राणीबागेत दरवर्षीप्रमाणे पालिकेचं वार्षिक उद्यान प्रदर्शन 13 ते 15 जानेवारी दरम्यान भरवण्यात आलं होतं.

 

प्रदर्शनात लहानग्यांचे आवडते 'कार्टून कॅरेक्टर्स'ही अवतरले होते. बार्बी डॉलने तर मुंबईकरांचे लक्ष वेधून घेतले.

 

 

 

 

 

 

मिकी माऊस सोबतच डोरेमॉन, डोनाल्ड डक, गुफी, स्नोव्हाईट यांच्यासह जंगलबुक मधला अॅनाकोंडा हे बच्चेकंपनीच्या पसंतीस उतरले.

 

 

गुलाब, कमळ, झिनिया, व्हर्बिना, डायांथस, मोगरा अशा कित्येक प्रकारच्या फुलांनी हे उद्यान सजलं होतं. परदेशी प्रकारच्या भाज्यांचं तर एक स्वतंत्र दालनच होतं. त्यामध्ये झुकिनी, सलगम नावाचे कंद, नवलकोल, ब्रोकोली, लाल कोबी, लेट्यूससारख्या भाज्यांचा समावेश होता. शिवाय आंबा, मोसंबी, आवळा, पेरू, चिकू, फणस अशा फळांची झाडंही पाहायला मिळाली.

 

 

 

प्रदर्शनातील विक्री दालनामध्ये विविध प्रकारच्या झाडांची रोपे, बियाणे, खते,बागकामाची अवजारे, बागकाम विषयक पुस्तके यासारख्या अनेक बाबी विक्रीस उपलब्ध होत्या. शोभेची रोपे ते औषधी वनस्पती, गांडूळ खते, किटकनाशके असा अनेक गोष्टी विक्रीसाठी उपलब्ध होत्या.

 

 

 

मुंबईसारख्या शहरात बागेसाठी जागा मिळणं तसं कठीणच. पण वर्टिकल गार्डन हाही एक पर्याय उपलब्ध आहे. कमी जागतेही रॅक्सचा उपयोग करून वर्टिकल रचनेत आपण सुंदर बाग फुलवू शकतो. दुसरा पर्याय म्हणजे कमी जागेत आपण हँगिंग प्लॅन्ट्सही लावू शकतो.

झाडं, फुलं ही खरं तर निसर्गाचा अनमोल खजिनाच आहे. हा ठेवा जतन करणं ही आपलीच जबाबदारी. त्यामुळे आता निर्णय तुमचा आहे.

 

संबंधित विषय
ताज्या बातम्या