Advertisement

खवय्यांसाठी काळाघोडा फेस्टिव्हल!


खवय्यांसाठी काळाघोडा फेस्टिव्हल!
SHARES

काळाघोडा - प्रत्येक वर्षी काळाघोडा फेस्टिव्हल नवीन काहीतरी घेऊन येतो. यावर्षी तुम्हाला खाद्यसंस्कृती संबंधित कार्यक्रम आणि प्रात्यक्षिकं दिसतील. काळाघोडा इथल्या क्रॉसमैदानात दिग्गज शेफनी बनवलेल्या खाद्यपदार्थांचा आस्वादही घेता येणार आहे. नवनवीन खाद्यपदार्थ कसे बनवले जातात या कार्यशाळेचंही या वेळी आयोजन करण्यात आलं आहे. काळाघोडा 2017 मधील फूड फेस्टिव्हलला 'हॉर्स रॅडिश' असं नाव देण्यात आलंय. यामध्ये मुंबईच्या बदलत्या खाद्यसंस्कृतीचं प्रतिबिंब तुम्हाला दिसेल.
इथे येणाऱ्या प्रत्येकाच्या अभिरुचीला अनुसरून या फूड फेस्टिव्हलचं आयोजन केलं आहे. या फेस्टिव्हलमध्ये रणबीर ब्रार, अजय चोप्रा, राखी वासवानी, पूजा धिंग्रा आणि रुषिना मनशॉ घिडियाल हे दिग्गज शेफ सामील होणार आहेत.
क्रॉस मैदानात होणाऱ्या या फूड फेस्टिव्हलमध्ये खाद्यजगतातले नावाजलेले ब्रँड आणि रेस्टॉरंटही भाग घेणार आहेत. इथे राजस्थानी (अपनो राजस्थानी कॅटेरर्स), काश्मीरी (कश्मीर की कहानी), तिबेटन (मोमो) कोळी (साधना किचन) आणि भारतीय मिठाई (शाही दरबार ) यांचे फुडस्टॉल लागणार आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा