• शिवाजी पार्क जिमखान्यात ख्रिसमस सेलिब्रेशन
SHARE

दादर - ख्रिसमसनिमित्त दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्यात लहान मुलांसाठी ख्रिसमस पार्टीचं आयोजन करण्यात आलं होत. या जिमखान्यात दरवर्षीच लहान मुलांसाठी पार्टीचं आयोजन करण्यात येतं. या वर्षी विद्युत रोषणाई आणि मुलांसाठी वेगवेगळे खेळ ठेवण्यात आले होते. त्यामुळे मुलांचा उत्साह बघण्यासारखा होता. मुलांसाठी क्लबनं केलेली व्यवस्था पाहून पालकांनीही क्लबच्या आयोजनाचं कौतुक केलं. सांताक्लॉजने मुलांना वेगवेगळी गिफ्ट्स देऊन खूश केलं. त्यामुळे छोट्यांचा आनंद आणखीनच द्विगुणीत झाला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या