SHARE

अँटॉप हिल- अँटॉप हिलच्या सी.जी.एस कॉलनी सेक्टर १ मधल्या सुयोग्य मंडळानं यावर्षी विठ्ठलाच्या रूपात बाप्पाची प्रतिकृती साकारली आहे. मुंबईचा राजा या स्पर्धेसाठी या मंडळाची निवड करण्यात आली आहे. आकाश किरमल यांनी ही गणेश मूर्ती साकारली आहे. आकाश किरमल फक्त याच मंडळाची गणेश मूर्ती बनवतात. ११ सप्टेंबरला मंडळानं वैद्यकीय तपासणी शिबिरही आयोजित केलंय. मंडळाचे अध्यक्ष भरत जेठला यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. 

संबंधित विषय
ताज्या बातम्या