चित्र प्रदर्शनाचं आयोजन

 BDD Chawl
चित्र प्रदर्शनाचं आयोजन
चित्र प्रदर्शनाचं आयोजन
चित्र प्रदर्शनाचं आयोजन
See all

वरळी - वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये 1 ते 7 नोव्हेंबर दरम्यान ग्रुप चित्रप्रदर्शन भरवण्यात आलंय. या मध्ये 7 वेगवेगळ्या चित्रकारांच्या कलाकृतींचा समावेश आहे. यामध्ये चित्रकार दीपा धुरी, वर्षा ठक्कर आणि वर्षा पारीख यांची कृष्ण आणि गणपतीची आकर्षक आणि मनमोहक चित्रं अाहेत. तर प्रदर्शनात ठेवलेल्या बेला मेहता यांच्या बुद्धांच्या चित्रांनांही विषेश मागणी आहे. बेला मेहतांची बुद्धांची 6-7 चित्रं प्रदर्शनात आहेत. स्मृती भुखानवाला यांनी कॅनव्हासवर ऑइल पेंटनं रेखाटलेली आणि स्त्री सौंदर्याला वाहिलेली चित्रंही लक्षवेधी आहेत. प्रदर्शनात एकूण 45 चित्रं असून त्यांच्या किंमती 10 हजारांपासून साडे तीन लाखांपर्यंत आहेत. हे प्रदर्शन सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत रसिकांसाठी खुलं आहे.

Loading Comments