मुंबईची मुंबादेवी !


  • मुंबईची मुंबादेवी !
SHARE

मुंबादेवी - डोळ्यातील वात्सल्य... चेहऱ्यावरील तेज... स्मित हास्य... कपाळावर चांदिचे मुकुट... चांदिच्या सिंहावर विराजमान आकर्षक अशी मुंबादेवी... साजश्रृंगार करून नटलेल्या देवीचे हे रूप डोळ्यांचे पारणे फिटतात... मुंबईची ग्रामदेवता म्हणून मुंबादेवीची लौकीकता... तिची लौकीकता ऐकून मुंबादेवीच्या चरणी माथा टेकण्याची इच्छा प्रत्येक भाविकाची असते. तसे तर वर्षाच्या बारा महिने या मंदिरात भाविकांची अलोट गर्दी असते... पण नवरात्रीमध्ये तर भाविकांची झुंबडच उडालेली असते... यासाठी मंदिर प्रशासनातर्फे सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त केलेला असतो. मंदिरात दिवसातून सहावेळा देवीची आरती केली जाते. या देवीच्या नावाबद्दल मात्र अनेक दंतकथा प्रचलित आहेत. एक कथा जोडली गेली आहे ती कोळी बांधवांशी. कोळी समाजातल्या मुंगा किंवा मोंगू नावाच्या कोळीणीने बोरीबंदर इथं देवीची स्थापना केली होती. 1737 साली ब्रिटिशांनी मुंबईभोवती असलेल्या किल्ल्याचा विस्तार करण्याचे ठरवले. त्यामुळे देवीचे मूळ स्थान हलवण्यात आले. त्यानंतर देवीची स्थापना काळबादेवी परिसरात करम्यात आली. त्यानंतर मुंबईकरांवर कोसळलेले संकट टाळणारी देवी अशी तिची प्रचिती झाली...

संबंधित विषय
ताज्या बातम्या