• निरोगी आरोग्यासाठी फक्त 20 मिनिटं
SHARE

वडाळा - धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे लक्ष देणंही गरजेचं आहे. बदलती जिवनशैली याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतच असतो. पण रोजच्या धावपळीच्या जीवनात काही वेळ आपल्या शरीरासठी दिलाच पाहिजे. याच पार्श्वभूमीवरून श्री कृष्ण स्पोर्ट्स क्लब आणि वडाळा इथल्या श्रीकृष्णनगर रहिवाशांनी मोफत योगा प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलं होतं. योगा शिबिराचे प्रशिक्षण योगा प्रशिक्षक तुषार घोरपडे त्यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येतंय. 18 डिसेंबरपर्यंत आयोजित या शिबिरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी सहभाग घेतला होता. कितीही व्यस्थ शेड्युल असलं तरी 20 मिनिटं योगा हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. मग चला सर्वांनीच योगा करण्याचा संकल्प करून आजारांवर मात करूया.

संबंधित विषय
ताज्या बातम्या