बच्चे कंपनीचा आनंद गगनात मावेना

शिवडी - 'किड्स विला' या प्ले ग्रुपमध्ये शुक्रवारी 'काईट फेस्टीव्हल' चे आयोजन करण्यात आले होते. या फेस्टिव्हलचा आनंद लुटला इथे शिकणाऱ्या चिल्ल्या-पिल्ल्यानी. रंगीबेरंगी वेशात आलेली ही बच्चेकंपनी हातात पतंग घेऊन आकाशाला गवसणी घालण्याचा जणू प्रयत्न करत होती. या प्ले ग्रुपचं वैशिष्ट्य म्हणजे इथे सगळे सण मोठ्य़ा उत्साहात साजरे होतात आणि मुलांना एक वेगळा आनंद देतात. याचं सर्व श्रेय जातं 'किडस् विला' या प्ले ग्रुपला अर्थातच त्यांच्या शिक्षकांना. विविध रंगाचे पतंग हातात घेऊन या मुलांनी मकरसंक्रांतीचा खऱ्या अर्थाने आनंद लुटला.

Loading Comments