Advertisement

उपवास केल्याचे धार्मिकच नाही तर शारीरिकही फायदे


उपवास केल्याचे धार्मिकच नाही तर शारीरिकही फायदे
SHARES

नवरात्रीत अनेकांनी नऊ दिवस उपवास केले असतील. त्यातील काही जण फक्त पाणी किंवा फळांवर नऊ दिवस राहिले असतील. तर काही जणांनी फक्त पहिल्या किंवा शेवटच्या दिवशी उपवास केले असतील. तसं पाहायला गेलं तर नवरात्रीच्या उपवासाचं धार्मिक महत्त्व आहेच. पण यासोबतच उपवास आरोग्यदायक देखील आहे. जाणून घ्या उपवास करण्याचे नेमके काय फायदे आहेत.

१) उपवासादरम्यान काही आवश्यक पोषक तत्व शरीराला मिळणे गरजेचे असतात. शरीराला आवश्यक पोषक तत्व नाही मिळाली तर अशक्तपणा येण्याची शक्यता असते. त्यामुळे उपवासामध्ये किंवा उपवास सोडल्यानंतर तुम्ही जे काही खाल ते पौष्टीक असलं पाहिजे. अशावेळी कमी फॅट्स असलेले पदार्थ खावेत.

२) उपवास केल्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ निघून जातात. त्याचबरोबर पचनक्रिया सुरळीत होण्यासही मदत होते.

३) शरीरातील फॅट्स सेल्समधून लॅप्टिन नावाचं एक हार्मोस स्त्रवलं जातं. उपवासादरम्यान कमी कॅलरीज मिळाल्यानं लॅप्टिनच्या सक्रियतेवर प्रभाव पडतो आणि वजन कमी होते.

४) उपवासादरम्यान फॅट्स बर्न होण्याची प्रक्रिया जलद गतीनं होते आणि वजन नियंत्रणात राहते.

५) शरीरातील विषारी पदार्थ साफ करण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी तुम्ही कधीही उपवास करू शकता. त्यासाठी एखाद्या सणाची वाट कशाला पाहावी.

६) उपवास केल्यानं नवीन रोग प्रतिरोधक पेशी तयार होण्यास मदत होते.

७) तणाव वाढला की आपण अधिक खातो. उपवासामुळे तोंडावर नियंत्रण तर राहतंच. याशिवाय तणावही कमी होतो.

८) काही वेळासाठी उपवास केल्यानं मेटाबॉलिक रेटमध्ये ३ ते १४ टक्क्यांनी वाढ होते. यामुळे पचनक्रिया आणि कॅलरी बर्न होण्यासाठी कमी वेळ लागेल.

९) उपवास केल्यानं डोकं शांत राहतं. त्याचप्रमाणे डिप्रेशन आणि मेंदूशी जोडलेल्या अनेक समस्यांपासूनही सुटका होते.





संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा