'लेनोव्हो'चा नवा लॅपटॉप

BMC office building
'लेनोव्हो'चा नवा लॅपटॉप
'लेनोव्हो'चा नवा लॅपटॉप
'लेनोव्हो'चा नवा लॅपटॉप
'लेनोव्हो'चा नवा लॅपटॉप
See all
मुंबई  -  

परळ - टॅब्लेट्स आणि स्मार्टफोन्समधील प्रबळ निर्माता असलेल्या 'लेनोव्हो' ने नव्या लॅपटॉपचे आयटीसी येथे सादरीकरण केले. हा लॅपटॉप वजनाने हलक्या, सडपातळ मात्र वेगाने काम करणारा आहे. यावेळी लेनोव्हो विपणन संचालक भास्कर चौधरी उपस्थित होते.

यात आयडियापॅड ७१० अतिशय वेगवान काम करणारा असून अल्युमिनियम आणि मॅग्नेशियमपासून बनवलेल्या मेटल फ्रेममध्ये १३.३ इंची आहे. यात फुल एचडी आयपीएस पॅनल बसविण्यात आले आहे. त्याची जाडी १३.९ मिमी. असून वजन केवळ १.२ किलो आहे. हाय-स्पीड पीसील सॉलिड टेस्ट ड्राईव्ह आणि क्विक चार्जिंग सुविधेने सज्ज असलेला हा लॅपटॉप ग्राहकांच्या व्यावसायिक मागण्यांची पूर्तता करणारा आहे. याच श्रेणीत आयडियापॅड ५१० एस लॅपटॉप हि आहे. सतत प्रवासात असलेल्या ग्राहकांना उत्पादक बनवण्यात आणि ते उपयोगात आणण्यात मदत करेल. त्यात वेगवान चार्जिंग आणि हर्मन कार्डन ऑडियो सिस्टीम या सुविधा आहेत. तर भारतातील गेमिंग पीसीची वाढती मागणी लक्षात घेऊन मोठ्या स्क्रीनचा आयडियापॅड वाय ७०० हा देखील सादर केला.

किंमत आणि उपलब्धता -

आयडियापॅड ५१० - ५१,०९० रुपये
आयडियापॅड ७१० - ५१,०९० रुपये
आयडियापॅड वाय ७०० - १,२८,०९० रुपये
आयडियापॅड ३१० - २८,३९० रुपये
योगा ५१० - ४०,९९० रुपये
योगा ७१० - ८५,४९० रुपये
मिक्स ३१० - १७,४९० रुपये

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.