Advertisement

जुन्या साड्या पडून आहेत? नॉट टू वरी


जुन्या साड्या पडून आहेत? नॉट टू वरी
SHARES

साड्या म्हणजे महिलांचा जीव की प्राण... समारंभ कुठलाही असो पण महिला साडी नेसायलाच प्राधान्य देतात. दर समारंभांला नवीन साडी खरेदीचा अट्टहास केला जातो. कारण त्या साड्या कधी ना कधी कुठल्या तरी समारंभात नेसलेल्या असतात. मग पुन्हा तिच साडी कशी नेसायची. म्हणून नवीन साडीच घेतली जाते. पण जुन्या साड्यांचं काय? त्या तशाच कपाटाच्या कोपऱ्यात पडलेल्या असतात. त्या साड्या एक-दोन समारंभांना घातल्या की झालं. त्यानंतर त्यांच्याकडे बघितलं देखील जात नाही. अनेक वेळा साड्यांचे काठ खराब होतात किंवा साड्या जीर्ण होतात. पण आता नॉट टू वरी. आता त्यावर देखील उपाय आहे. काय तो पाहूया.


साड्यांपासून बनवा ड्रेस

बनारसी साडी प्रत्येकाच्या घरात असतेच असते. बनारसी साडी नसेल तर दुसरी कुठली तरी रेशमी, कॉटनची साडी तर नक्कीच असेल. या साड्यांच्या बॉर्डर मोठ्या असतात. त्यामुळे या साड्यांपासून छानसा पायघोळ ड्रेस बनवता येऊ शकतो. एखाद्या समारंभात हा ड्रेस छानपैकी उठून दिसेल. 


सौजन्य

याशिवाय अनेक वेळा साडीचे काठ खराब होतात. अशा वेळी साडीचा ड्रेस आणि त्यावर नवीन एखादी बॉर्डर तुम्ही लावू शकता. बनारसी ब्रोकेड किंवा प्लेन योक असं काॅम्बिनेशन हल्लीची फॅशन झाली आहे. याशिवाय तुम्ही बनारसी साडीचा वापर एका ड्रेसवर दुपट्टा म्हणून देखील करू शकता. 


सौजन्य

याशिवाय साडीपासून तुम्ही कुर्ता बनवू शकता. कुर्त्याखाली घालण्यासाठी मॅच होईल या कलरचा प्लेन कपडा घेऊन तुम्ही प्लाझो शिवू शकता. तुमचा कुर्ता प्लेन असेल तर तुम्ही डिझाईनर प्लाझो शिवून घ्या. किंवा त्याच साडीची लेगीज किंवा प्लाझो बनवू शकता. असे ड्रेस तुम्ही पार्टीमध्ये देखील वापरू शकता.


२) कॉटनच्या साडीचा वनपीस

कॉटनचे ड्रेसेस वापरायला एकदम सुटसुटीत आणि कधीही वापरता येतील असे असतात. त्यामुळे तुमच्याकडे जर कॉटनची साडी असेल तर त्यापासून तुम्ही छानसा लांब किंवा शॉर्ट असा वनपीस बनवू शकता. 


सौजन्य

वनपीस थोडा स्टाईलीश बनवण्यासाठी त्याला बॅक लेस हा पर्याय देखील आहे. वनपीसमध्ये तुम्ही बेल्ट, लटकन किंवा पुढच्या बाजूला ऑक्साईडचे झुमके लावू शकता. यासाठी माहेश्वरी, इंडिगो किंवा ब्लॉक प्रिंट अशा साड्या वापरता येतील.


जॅकेटचा भन्नाट पर्याय

साडीपासून तुम्ही एखादे जॅकेट बनवू शकता. वरपासून खालपर्यंत घालता येईल असे लाँग ओपन जॅकेट हा देखील एक पर्याय आहे. या जॅकेटला तुम्ही स्टाईलीश अशी बटणं लावली तर याचा ड्रेस देखील होईल. 


सौजन्य


एखाद्या काँट्रास्ट गाऊनवर ओपन जॅकेट म्हणून किंवा लेगिंग्जवर फ्रंट स्लिट ओपन ड्रेस म्हणूनही वापरू शकता. जिन्सवर देखील तुम्ही हे जॅकेट कम ड्रेस वापरू शकता.




अनारकली टू लेहंगा

साडीपासून अनारकली तर अनेकांची पहिली चॉईस असेल. साडीपासून तुम्ही अनारकली बनवला आणि तुम्हाला त्या अनारकलीचा कंटाळा आलाय. मग यासाठी आमच्याकडे एक भन्नाट आयडिया आहे. ती म्हणजे तुम्ही अनारकलीचा लेहंगा बनवू शकता.


सौजन्य

अनारकली घालायचा कंटाळा आला की साडीचा मस्त लेहंगा आणि वरच्या भागाचं क्रॉप टॉप. आहे की नाही ही जबराट आयडिया?


साड्यांना वेर्स्टन टच

साडीपासून तुम्ही फक्त ड्रेस, प्लाझो किंवा लाँग वनपीसच नाही. तर साडीपासून तुम्ही वेर्स्टन कपडे देखील बनवू शकता. कर्नाटकी कॉटन, कलमकारी किंवा वेगवेगळ्या प्रिंट्समध्ये तुम्ही शॉर्ट, नी लेन्ग्थ किंवा अँकल लेन्ग्थ असे प्रकार ट्राय करू शकता. याशिवाय शॉर्ट स्कर्ट देखील चांगला पर्याय आहे. त्यावर क्रॉप टॉप देखील सुंदर दिसेल.


सौजन्य

काय मग? तुमच्या कपाटात पडलेल्या साड्या बाहेर काढा आणि एक से एक हटके ड्रेस बनवा. म्हणजे प्रत्येक संमारंभांमध्ये तुम्ही हटके आणि सुंदर दिसाल.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा