मालती मेनन यांचं चित्रप्रदर्शन

 BDD Chawl
 मालती मेनन यांचं चित्रप्रदर्शन
 मालती मेनन यांचं चित्रप्रदर्शन
 मालती मेनन यांचं चित्रप्रदर्शन
 मालती मेनन यांचं चित्रप्रदर्शन
 मालती मेनन यांचं चित्रप्रदर्शन
See all

वरळी - नेहरू सेंटर येथे प्रसिद्ध चित्रकार मालती मेनन यांच्या चित्रांचं प्रदर्शन सुरू आहे. या प्रदर्शनात त्यांच्या 21 चित्रांचा समावेश असून, या चित्रांच्या किमती 45 हजारांपासून ते दीड लाखांपर्यंत आहेत.

हे प्रदर्शन 17 ऑक्टोबरपर्यंत रसिकांसाठी खुलं राहणार आहे. ज्या वस्तूंमुळे मन प्रफुल्लित होतं आणि उत्साह वाढतो, अशा प्रकारची वेगवेगळ्या रंगसंगतीतील चित्रं हे मालती यांच्या कलेचं मुख्य वैशिष्ट्य आहे. 2014 मध्ये त्यांच्या चित्रांचे ओमानमध्ये सोलो प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनात तेथील संस्कृतीवर रेखाटण्यात आलेल्या चित्रांचा प्रामुख्याने समावेश होता. मालती मेनन या सध्या सुरतमधील आयआयएफटी या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना इलेस्ट्रेशन शिकवतात.​

Loading Comments