Advertisement

नवरात्रोत्सवानिमित्त भोंडल्याचं आयोजन


नवरात्रोत्सवानिमित्त भोंडल्याचं आयोजन
SHARES

मुलुंड - म्हाडा कॉलनीमध्ये शुक्रवारी नवरात्रोत्सवानिमित्त भोंडल्याचं आयोजन करण्यात आलं होतं. सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळातर्फे आयोजित या कार्यक्रमात हेरंब संगीत कला अकादमीमधील ग्रुपनं हा कार्यक्रम सादर केला. खास स्थानिक महिलांसाठी हा कार्यक्रम होता. भोंडल्यात हत्तीच्या छोट्याशा पुतळ्याभोवती स्त्रिया गाणी म्हणून फेर धरतात. हा सण मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. सविता हांडे यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. सर्व महिलांनी अगदी साज शृंगारासह पारंपरिक वेश परिधान केला होता. 'दांडिया किंवा गरबा या पेक्षा आपल्या पारंपरिक खेळांचं आयोजन झालं पाहिजे, त्यामुळेच नव्या पिढीला त्यांची ओळख होईल,' असं मत मंडळाचे अध्यक्ष रवी नाईक यांनी या वेळी व्यक्त केलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा