वांद्रे - पाणीपुरी... नाव ऐकताच सुटलं ना तोंडाला पाणी? पाणीपुरी मुंबईत सगळीकडेच मिळते. पण वांद्रे पश्चिमेतल्या एल्को पाणीपुरीचा स्वाद काही औरच.
या एल्को पाणीपुरीची सुरुवात १९६८मध्ये एका छोट्याश्या स्टॉलपासून झाली. 50 वर्षं उलटून गेल्यानंतरही आजही या पाणीपुरीची चव कायम आहे. ही चव अनेक अभिनेते अभिनेत्री आणि पर्यटकांनाही इथे ओढून आणते.
इथे फक्त पाणीपुरीच मिळते असं नाही, तर मलई कुल्फी, मटका रबडी, छोले भटुरे, बास्केट चाट त्याचबरोबर तवा पुलाव असे चविष्ट खाद्यपदार्थ इथे मिळतात. जिभेचे चोचले पुरवताना इथे स्वच्छतेकडेही खूपच बारकाईनं लक्ष दिलं जातं...